AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात खळबळ! एकच शिवसेना राहिली… खासदार फुटीनंतर अमित शाहांचे मोठे विधान

राज्यात शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार फुटीवरुन वातावरण तापले असतानाच केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी थेट आता एकच शिवसेना राहिली आहे असे म्हटले आहे.

राज्यात खळबळ! एकच शिवसेना राहिली... खासदार फुटीनंतर अमित शाहांचे मोठे विधान
अमित शाहImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 20, 2026 | 1:26 PM
Share

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी 6 खासदार हे बंडखोरी करण्याच्या मार्गावर आहेत. ठाकरे गटाने व्हीप जारी करुन तातडीने बैठक बोलावली होती. या बैठकीला देखील 6 खासदारांनी दांडी मारली. हे सहा खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले आहे.

काय म्हणाले अमित शाह?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर महत्त्वाचे विधान केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करताना त्यांनी त्यांना “शिवसेना नेते” असे संबोधित केले आणि स्पष्ट केले की, आता शिवसेनेत कोणतेही गट उरलेली नाही. अमित शाह म्हणाले, “पूर्वी शिंदेंच्या पाठी शिवसेना शिंदे गट असं बोलावं लागायचं. आता कोणताही गट राहिला नाही. आता एकच शिवसेना राहिली आहे.” हे विधान महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे मानले जात आहे.

२०२२ मध्ये झालेल्या शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाला सुरुवातीला ‘शिवसेना शिंदे गट’ आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘ठाकरे शिवसेना गट’ असे संबोधले जात होते. आता अमित शाह यांच्या या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे गटाची शिवसेने शिल्लक राहणार असल्याचे संकेत आहेत.

अंबाबई मंदिराचा निकाल

भाषणात बोलताना अमित शाह यांनी अंबाबई मंदिराचा जीर्णोद्धार करणार असल्याचे सांगितले. ‘जिथे माता अंबाबाई शेकडो वर्षापासून वास करतेय तिथे महाराष्ट्र सरकार जीर्णोद्धार करत आहे. त्यामुळे देशभरातील भक्तांना त्याचा प्रचंड आनंद आहे. सातव्या शतकात आकार घेतलेले मंदिर पुन्हा एकदा भक्तांच्या स्वागतासाठी उभे राहणार आहे. 41 मंदिराचे संरक्षण करुन हा जीर्णोद्धार करणार आहे. AI कॅमेरा, हेरिटेज वाल, साउंड अँड लाईट शो आशा अनेक विविध सोयीनी या मंदिराचा जीर्णोद्धार 6 महिन्यात होणार आहे. 1500 कोटी काही मोठी गोष्ट नाही. जिथे आपला धर्म, संस्कार घट्ट धरून ठेवला गेला त्यासाठी ही रक्कम मोठी नाही. आम्ही लहान असताना राम मंदिर निर्माणसाठी आम्ही गावोगावी फिरत होते. त्यावेळी लोकं म्हणायचे मंदिर आपल्याला पाहायला मिळत नाही. आम्हालाही तसे वाटायचे. पण ही रामाची इच्छा होती की 2014 मध्ये भाजपची सत्ता आली आणि त्यानंतर राम मंदिराच्या कामाला सुरुवात झाली’ असे ते म्हणाले.

मोदीजींनी रेकॉर्ड बनवला की देशातील सर्वाधिक जास्त काळ पंतप्रधान म्हणून कार्यरत असल्याचा. या 12 वर्षात सोमनाथ ते गंगासागर आणि संपूर्ण देशात एनडीएचे शासन करत आहेत. आम्हाला म्हणायचे सगळीकडे जाऊ शकता पण पश्चिम बंगालमध्ये कसे पोहोचणार. पण आम्ही पश्चिम बंगालमध्ये पण सत्ता आणली. मी शब्द देतो की बंगाल मधून एक एक घुसखोरांना बाहेर काढतो असे अमित शाह पुढे म्हणाले.

Follow Us
1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल
Raj Thackeray | 1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, राज ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल; सरकारची पिसेच काढली
निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरण
Video | निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरणात नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता..
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता... राज ठाकरेंचा मोठा दावा
खासदार फोडणं, आमदार फोडणं... राज्याचा विचका झालाय!; राज ठाकरे भडकले
खासदार फोडणं, आमदार फोडणं... राज्याचा विचका झालाय!; राज ठाकरे भडकले
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टात काय घडतंय? न्यायालयाने नमूद
Pawanraje Nimbalakr Case | पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टात काय घडतंय? न्यायालयाने नमूद केल्या महत्त्वाच्या गोष्टी
परभणीत ATS चा धडाका! 10 ठिकाणी छापेमारी, अनेक जण ताब्यात!
Parbhani News | परभणीत ATS चा धडाका! 10 ठिकाणी छापेमारी, अनेक जण ताब्यात!
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी सांगितली 2024 मधील ती गोष्ट
कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा...; राऊतांनी उडवली खिल्ली
Sanjay Raut | कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा वाजवत बसतील; राऊतांनी उडवली खिल्ली
20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल
Omraje Nimbalkar | 20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज मोठा निकाल; ओमराजे मुंबईच्या दिशेने रवाना
अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?
मोठी बातमी! अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?, फोटोमधून झाला खुलासा