IPL 2026: आता भारतासाठी खेळायचं नाही…! विराट कोहलीने असं का म्हणाला? व्हिडीओ झाला व्हायरल
आयपीएल 2026 स्पर्धेत विराट कोहलीने पुन्हा एकदा आपला क्लास दाखवला आहे. विराट कोहलीने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात शतक ठोकलं आहे. या डावात त्याचं म्हणणं स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं. आता ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Virat Kohli Hilarious Stump Mic Moment: विराट कोहलीने सलग दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर आपल्या भात्यातून शतक काढलं आहे. विराट कोहलीने कोलता नाईट रायडर्संविरुद्धच्या सामन्यात 60 चेंडूत नाबाद 105 धावांची खेळी केली. त्याने 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने या धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 175चा होता. या खेळीदरम्यान त्याचा आत्मविश्वास वाखण्याजोगा होता. त्याने सावध पण संघाला विजयाच्या वेशीवर नेईपर्यंत लढत दिली. विराट कोहलीने धावांचा पाठलाग करताना स्कूप शॉट्सची शॅडो प्रॅक्टिसही करताना दिसला. असे फटके कधी विराट कोहली मारत नाही, पण त्याने प्रयत्न सुरू केला आहे. या दरम्यान त्याचं एक विधान स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं आहे. आता त्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
विराट कोहलीने मनीष पांडेला सांगितलं की, ‘आता भारतासाठी थोडी ना खेळायचं आहे, आता तर प्रत्येक शॉट मारणार.’ त्याचं हे विधान टी20 आंतरराष्ट्रीय संघातून घेतलेल्या निवृत्तीवर आहे. त्यामुळे आात प्रत्येक फटका मनमोकळेपणाने मारण्याचा आनंद लुटत आहे. विराट कोहलीने टी20 वर्ल्डकप 2024 नंतर आंतरराष्ट्रीय टी20 संघातून निवृत्ती घेतली. आता टीम इंडियासाठी फक्त वनडे सामने खेळत आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत फलंदाजीचा पुरेपूर आनंद लुटत आहे. आता मागच्या काही इनिंगच्या तुलनेत वेगाने धावा करत आहे. इतकंच काय तर सुरूवातीलाच मोठे फटके मारत आहे. यापूर्वी त्याची फलंदाजीची स्टाईल अशी नव्हती.
VIRAT KOHLI ON STUMP MIC 😭
“Ab to India k liye thodi naa khelna hai ab to har shot lgega”. pic.twitter.com/Z3ou2nUyoy
— VIKAS (@Vikas662005) May 14, 2026
विराट कोहलीने आयपीएल 2026 स्पर्धेत आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. त्याने 53.78 च्या सरसरीने 484 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. इतकंच काय तर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, गतविजेत्या आरसीबीने संघाने 16 गुणांचं गणित सोडवलं आहे. त्यामुळे प्लेऑफमधील स्थानही जवळपास पक्कं झालं आहे. त्यामुळे यंदाही जेतेपदाच्या शर्यतीत आरसीबी संघ आघाडीवर आहे.