AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Babar Azam | बाबर आझम ललव्या बॉलवर ढेर, अफगाणिस्तान विरुद्ध बघा कसा आऊट झाला

Babar Azam Out On Duck | बाबर आझम अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्याच वनडे मॅचमध्ये लाजीरवणाऱ्या पद्धतीने आऊट झाला.

Babar Azam | बाबर आझम ललव्या बॉलवर ढेर, अफगाणिस्तान विरुद्ध बघा कसा आऊट झाला
| Updated on: Aug 22, 2023 | 8:16 PM
Share

हंबनटोटा | आशिया कप 2023 स्पर्धेला आता 7 दिवस शिल्लक राहिले आहेत. टीम इंडियाची युवा ब्रिगेड ही आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला आशिया कपआधी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान वनडे सीरिज खेळत आहेत. या 3 मॅचच्या वनडे सीरिजला आजपासून सुरुवात झाली. पाकिस्तान कॅप्टन बाबर आझम टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. हा सामना हंबनटोटा इथे खेळवण्यात येत आहे.

पाकिस्तानचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय हा चुकीचा ठरला. ओपनर बॅट्समन फखर झमान हा 2 धावा करुन पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. फजलहक फारुकी याने झमानला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर पाकिस्तानला दुसऱ्याच ओव्हरमध्ये मोठा झटका लागला. पाकिस्तानचा कॅप्टन आणि प्रमुख बॅट्समन बाबर आझम हा भोपाळा न फोडताच आऊट झाला. स्पिनर मुजीब उर रहमान याने बाबरला एलबीडब्ल्यू आऊट केलं.

2 वर्षांनंतर झिरोवर आऊट

बाबर 2 वर्षांनंतर झिरोवर आऊट झाला आहे. बाबर अखेरीस जुलै 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध डक आऊट झाला होता. बाबरची वनडे क्रिकेटमध्ये झिरोवर आऊट होण्याची चौथी वेळ ठरली.

एशिया कपआधी धोक्याची घंटा

दरम्यान एका टीमच्या कॅप्टनने मोठ्या स्पर्धेआधी अशाप्रकारे शून्यावर आऊट होणं हे निश्चितच पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा आहे. आशिया कपनंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा पार पडणार आहे. मात्र त्याआधी बाबर अशा प्रकारे आऊट झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

असा आऊट झाला बाबर

पाकिस्तानला 202 रन्सचं टार्गेट

दरम्यान पाकिस्तानने अफगाणिस्तानला विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्तान 47 ओव्हरमध्ये 201 रन्सवर ऑलआऊट झाली. पाकिस्तानकडून इमाम उल हक याने सर्वाधिक 61 धावा केल्या. शादाब खान याने 39, इफ्तिखार अहमद 30, रिझवान याने 21 आणि नसीम शाह याने 18* धावा केल्या. तर उर्वरित 6 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद नबी आणि राशिद खान या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर फजलहक फारुकी आणि रहमत या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमातुल्ला ओमरझाई, रशीद खान, अब्दुल रहमान, मुजीब उर रहमान आणि फजलहक फारुकी.

पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, आगा सलमान, शादाब खान, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.