AFG vs BAN : ‘माझ्याकडे आज…’, अफगाणिस्तानच्या विजयाचा हिरो नवीन उल हक मॅच नंतर काय म्हणाला?

AFG vs BAN : अफगाणिस्तानच्या टीमने आज ऐतिहासिक कामगिरी केलीय. त्यांनी बांग्लादेशला नमवून T20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचा T20 वर्ल्ड कपमधील प्रवास इथेच संपुष्टात आलाय. नवीन उल हक अफगाणिस्तानच्या या विजयाचा हिरो ठरला.

AFG vs BAN : 'माझ्याकडे आज...', अफगाणिस्तानच्या विजयाचा हिरो  नवीन उल हक मॅच नंतर काय म्हणाला?
तसेच नवीन उल हक याचा वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तान संघात समावेश करण्यात आला आहे. राशिद खान अफगाणिस्तनाचं नेतृत्व करणार आहे. नवीनने या हंगामात आतापर्यंत 7 विकेट्स घेतल्या आहेत.
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 11:20 AM

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानच्या टीमने अल्पावधीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय. मागच्या काही वर्षात या टीमच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा दिसून येत होती. आज या टीमने T20 वर्ल्ड कप 2024 च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. आधी त्यांनी सुपर-8 राऊंडमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवलं. सेमीफायनल प्रवेशासाठी बांग्लादेश विरुद्धचा सामना अफगाणिस्तानसाठी करो या मरो होता. या मॅचमध्ये अफगाणिस्तानची टीम हरली असती, तर त्यांचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं असतं. पण राशिद खानच्या या टीमने लढाऊ बाणा दाखवला व थेट पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. अफगाणिस्तान क्रिकेटसाठी आज दिवस खूप मोठा आहे. देशात अशांतता, एकाधिकारशाही, बॉम्बस्फोट, राजकीय स्थैर्य नसताना इतकी मोठी मजल मारण ही सोपी गोष्ट नाहीय.

अफगाणिस्तानने आज T20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर 8 राऊंडमध्ये बांग्लादेश विरुद्धच्या लो स्कोरिंग मॅचमध्ये शानदार विजय मिळवला. अफगाणिस्तानने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 115 धावा केल्या. T20 क्रिकेटच्या दृष्टीने हे खूप सोप लक्ष्य आहे. बांग्लादेशची टीम सहज विजय मिळवेल असं वाटलं होतं. पण अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी ठराविक अंतराने बांग्लादेशचे विकेट काढले व हा सामना 8 धावांनी जिंकला. बांग्लादेशचा डाव 105 धावांवर आटोपला.

विराट कोहलीशी घेतलेला पंगा

अफगाणिस्तानचा नवीन उल हक या विजयाचा हिरो ठरला. त्याने 3.5 ओव्हर्समध्ये 26 धावा देऊन 4 विकेट काढले. अखेरच्या क्षणी सामना रंगतदार अवस्थेत असताना त्याने तस्कीन अहमद आणि मुस्तफीझूर रहमान हे दोन महत्त्वाचे विकेट काढले. नवीन उल हक या अफगाणिस्तानच्या खेळाडूला भारतातही क्रिकेटप्रेमी ओळखतात. कारण त्याने मागच्या आयपीएल सीजनमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना विराट कोहलीशी पंगा घेतला होता.

मॅन ऑफ द मॅच पुरस्कारानंतर नवीन उल हक काय म्हणाला?

“मागच्या काही वर्षात आम्ही प्रचंड मेहनत केलीय. या दिवसासाठी आम्ही मेहनत केली. स्वप्न पाहिलं. माझ्याकडे आज शब्द नाहीयत. धावांचा पाठलाग करण सोप नव्हत. जो पर्यंत आम्ही विकेट काढू, तो पर्यंत सामन्यात आहोत, हे आम्हाला माहित होतं. मोठी धावसंख्या उभारण्यासारखी ही विकेट नाही हा आम्हाला विश्वास होता. आम्ही सहज धावा दिल्या नाहीत, तर आम्हाला विजयाची संधी आहे हे आम्हाला माहित होतं” असं सामनावीर पुरस्काराचा मानकरी नवीन उल हक म्हणाला.

Non Stop LIVE Update
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.