AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा, राशिद खान कॅप्टन, पहिला सामना केव्हा?

Afghanistan Squad For Asia Cup 2025 : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचं आशिया कप स्पर्धेत अष्टपैलू राशिद खान नेतृत्व करणार आहे. अफगाणिस्तान या स्पर्धेतील आपला पहिला सामना केव्हा आणि कुणाविरुद्ध खेळणार? जाणून घ्या.

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा, राशिद खान कॅप्टन, पहिला सामना केव्हा?
Afghanistan vs IndiaImage Credit source: Bcci
| Updated on: Aug 24, 2025 | 4:31 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या बहुप्रतिक्षित स्पर्धेचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं आहे. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या संघांना 4-4 प्रमाणे 2 गटात विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत पाकिस्तान, भारत, हाँगकाँग आणि बांगलादेशने संघ जाहीर केला आहे. त्यानंतर आता पाचव्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. अफगाणिस्तानने आशिया कप स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. तसेच राखीव म्हणून तिघांना संधी दिली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

राशीद खान कॅप्टन

राशीद खान या स्पर्धेत अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तसेच अनेक अनुभवी खेळाडूंनाही निवड समितीने संधी दिली आहे. अफगाणिस्तानने या स्पर्धेसाठी तगडा संघ उतरवला आहे. ऑलराउंडर मोहम्मद नबी याला संधी दिलीय. तसेच विराट कोहली याच्यासह पंगा घेणाऱ्या वेगवान गोलंदाज नवीन उल हक याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांसमोर अफगाणिस्तानचं तगडं आव्हान असणार आहे. अफगाणिस्तानला या स्पर्धेसाठी ब गटात ठेवण्यात आलं आहे. तसेच या गटात बांगलादेश, श्रीलंका आणि हाँगकाँगचा समावेश आहे.

अफगाणिस्तानचा पहिला सामना केव्हा आणि कुठे?

अफगाणिस्तान आशिया कप 2025 मोहिमेतील पहिल्याच सामन्यात मैदानात उतरणार आहे. अफगाणिस्तानसमोर या सामन्यात हाँगकाँगचं आव्हान असणार आहे. हा सामना 9 सप्टेंबरला होणार आहे. अफगाणिस्तान त्यानंतर 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर आपला दुसरा सामना खेळणार आहे.

क्रिकेट चाहत्यांना या सामन्यात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना 16 सप्टेंबरला होणार आहे. तसेच अफगाणिस्तान त्यांचा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा 18 सप्टेंबरला श्रीलंका विरुद्ध भिडणार आहे.

अफगाणिस्तानचा संघ जाहीर

आशिया कप 2025 साठी अफगाणिस्तान क्रिकेट टीम : राशिद खान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झाद्रान, दरविश रसूली, सेदिकुल्लाह अटल, अजमतुल्लाह उमरजई, करीम जनात, मोहम्मद नबी, गुलबदीन नईब, शराफुद्दीन अशरफ, मोहम्मद इशाक, मुजीब उर रहमान, अल्लाह गजनफर, नूर अहमद, फरीद मलिक, नवीन-उल-हक आणि फजलहक फारूकी.

राखीव खेळाडू : वफीउल्लाह ताराखिल, अब्दुल्ला अहमदजई आणि नांग्याल खारोटे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.