AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MS Dhoni in Hospital : एमएस धोनी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होणार? फॅन्ससाठी टेन्शन वाढवणारी बातमी

MS Dhoni in Hospital : दोन दिवसापूर्वीच CSK ने गुजरात टायटन्सला नमवून आयपीएल ट्रॉफी जिंकली. आता धोनीबद्दल एक बातमी समोर आलीय. धोनीला रुग्णालयात दाखल व्हाव लागू शकतं. त्याच्या वेगवेगळ्या चाचण्या होतील.

MS Dhoni in Hospital : एमएस धोनी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होणार? फॅन्ससाठी टेन्शन वाढवणारी बातमी
MS dhoni HospitalImage Credit source: PTI
| Updated on: May 31, 2023 | 11:25 AM
Share

मुंबई : एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने IPL 2023 च विजेतेपद मिळवलं. चेन्नईने फायनलमध्ये अटी-तटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सवर शेवटच्या चेंडूवर 5 विकेट राखून विजय मिळवला. चेन्नईने या विजेतेपदासह आयपीएलमध्ये पाच ट्रॉफी जिंकण्याच्या मुंबई इंडियन्सच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. चेन्नईने धोनीच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला. तो चेन्नईच्या विजयाचा मुख्य शिल्पकार आहे. पण याच धोनीला आयपीएलचा सीजन चालू असताना गुडघे दुखापतीचा त्रास जाणवत होता.

धोनी मैदानावर अनेकदा पाय खेचत चालताना दिसला होता. चेन्नईला 5 व्यां दा चॅम्पिन बनवल्यानंतर एमएस धोनी गुडघ्याची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांकडे गेला होता, अशी माहिती आहे.

संपूर्ण सीजन दुखापत अंगावर काढली

मिळालेल्या माहितीनुसार, एमएस धोनीने मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्या गुडघ्याची तपासणी केली. IPL 2023 च्या संपूर्ण सीजनमध्ये गुडघे दुखापतीचा त्रास धोनीने अंगावर काढला. फक्त चेन्नई सुपर किंग्सच्या विजयासाठी तो मैदानात होता. आता CSK ची टीम अजिंक्य ठरल्यानंतर त्याने हॉस्पिटलमध्ये जाऊन गुडघ्याची तपासणी केली.

दुखापतीबद्दल इतरांना कधी समजलं?

IPL 2023 मध्ये पहिल्याच सामन्यात खेळताना गुडघे दुखापतीचा त्रास झाला होता. 12 एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्याच्यावेळी धोनीचा गुडघे दुखापतीचा त्रास सर्वांच्या लक्षात आला. त्यानंतर धोनीच्या दुखापतीबद्दल चेन्नई सुपर किंग्सचे हेड स्टीफन फ्लेमिंग आणि बॅटिंग कोच माइक हसी यांनी वक्तव्य केली होती. त्यावरुन धोनीला गुडघे दुखापतीचा त्रास होत असल्याच स्पष्ट झालं.

धोनी मुंबईच्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेला?

धोनी गुडघे दुखापतीवर उपचार करण्यासाठी मुंबईच्या कोकीलाबेन रुग्णालयात गेला होता, अशी माहिती आहे. कदाचित धोनीला पुढील उपचारासाठी तिथे दाखल व्हाव लागेल. गुडघे दुखापत किती गंभीर आहे, त्याचा अंदाज घेण्यासाठी या आठवड्यात त्याच्या अनेक चाचण्या होऊ शकतात, असं रिपोर्ट्समध्ये म्हटलय.

म्हणून तो बॅटिंगसाठी शेवटला यायचा

IPL सामन्यादरम्यान अनेक व्हिडिओमधून धोनी गुडघे दुखापतीच्या समस्येने त्रस्त असल्याच दिसलं. त्यामुळे एकेरी-दुहेरी धावा पळून काढताना धोनीला अडचणी येत होत्या. त्यामुळे तो बॅटिंगसाठी सुद्धा शेवटला यायचा. रुग्णालयाकडून काय स्टेटमेंट?

धोनीने मुंबईच्या कोकीलाबेन रुग्णालयात जाऊन गुडघ्यांची तपासणी केली. पण याबद्दल अजून कुठलही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. धोनीने सोमवारी ट्रॉफी जिंकल्यानंतर इतक्यात निवृत्ती स्वीकारणार नसल्याच स्पष्ट केलं. त्यामुळे फॅन्सना पुढच्या सीजनमध्ये धोनी मैदानावर खेळताना दिसू शकतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.