IND vs ENG | शोएब अख्तरच्या तोंडावर जसप्रीत बुमराहची सणसणीत चपराक, फक्त 6 महिन्यात….Video

| Updated on: Feb 06, 2024 | 8:54 AM

IND vs ENG 2nd Test | फिरकी गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर जसप्रीत बुमराह आग ओकणारी गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 कसोटीत 15 विकेट घेऊन जसप्रीत बुमराह सीरीजमधील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनलाय. बुमराहने फक्त जास्त विकेटच घेतले नाहीत, तर त्याने विशाखापट्टनममध्ये भारताकडून सर्वाधिक षटक टाकली.

IND vs ENG | शोएब अख्तरच्या तोंडावर जसप्रीत बुमराहची सणसणीत चपराक, फक्त 6 महिन्यात....Video
Jasprit Bumrah
Image Credit source: PTI
Follow us on

IND vs ENG 2nd Test | हैदराबाद आणि विशाखापट्टनमच्या प्राण नसलेल्या खेळपट्टीवर जसप्रीत बुमराहने कमाल केलीय. 8 दिवसात त्याने कमालीच प्रदर्शन केलय. क्रिकेट चाहते जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडले आहेत. विशाखापट्टनम कसोटीत बुमराहने इंग्लिश फलंदाज ओली पोपच्या एका कडक यॉर्करवर दांड्या गुल केल्या. हा दीर्घकाळ स्मरणात राहील असा विकेट होता. या कामगिरीतून जसप्रीत बुमराहने बरच काही सिद्ध केलय. एक-दीड वर्षापूर्वी दुखापतीमुळे बुमराहबद्दल जे अंदाज बांधले जात होते, ते सर्व त्याने चुकीचे सिद्ध केलेत.

टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला 107 धावांनी हरवलं. बुमराहने शेवटचा फलंदाज बाद केला. एकूण 9 विकेटसह प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी त्याची निवड झाली. ऑगस्ट 2023 मध्ये बुमराहने मैदानावर पुनरागमन केलं. वर्ल्ड कप 2023 मध्ये त्याने कमालीचा खेळ दाखवला. 6 महिन्यापूर्वी जसप्रीत बुमराह असा खेळ दाखवेल, याची कल्पना क्वचितच कोणी केली असेल.

तेव्हा शोएब अख्तरच एक वक्तव्य चर्चेत आलेलं

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सुद्धा जसप्रीत बुमराहबद्दल शंका व्यक्त केली होती. त्याने बुमराहबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. जुलै 2022 मध्ये बुमराह पाठिच्या दुखण्यामुळे आशिया कपमधून बाहेर गेला. त्यानंतर दोन T20 सामने खेळून तो पुन्हा बाहेर गेला. टी 20 वर्ल्ड कपमध्येही तो खेळू शकला नाही. त्याचवेळी शोएब अख्तरच एक वक्तव्य चर्चेत आलं होतं. स्वत:च्या करिअरमध्ये शोएब अख्तरने अनेक दुखापतींचा सामना केलाय.

बुमराहची Action फ्रंट ऑन

बुमराहची Action फार काळ टिकणार नाही, अस शोएब त्यावेळी म्हणाला होता. बुमराहची Action फ्रंट ऑन आहे. चेंडू टाकताना त्याच शरीर समोर असतं. अख्तरसह बहुतांश पेसर साइन-ऑन असतात. फ्रंट ऑन Action असलेल्या गोलंदाजांना पाठिची दुखापत झाली की, ते फार तग धरु शकत नाहीत.


आयर्लंड सीरीजपासून ज्याने कोणी बुमराहचा खेळ पाहिलाय, तो हेच म्हणेल की…

फक्त हा शोएब अख्तरचा दावा नव्हता, अनेक एक्सपर्ट्स आणि फॅन्सना ही भिती होती की, बुमरहाने पुनरागमन केलं, तरी त्याला दुखापत होत राहीलं. पहिल्यासारखा तो घातक गोलंदाज राहणार नाही असं सुद्धा बोलल जात होतं. त्याच्या गोलंदाजीची धार कमी होईल, असं बोलल जात होतं. सर्जरीनंतर बुमराह एक वर्ष क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. ऑगस्ट 2023 मध्ये आयर्लंड दौऱ्यात T20 सीरीजद्वारे त्याने मैदानावर पुनरागमन केलं. तेव्हापासून आतापर्यंत विशाखापट्टनम टेस्टपर्यंत ज्याने कोणी बुमराहची गोलंदाजी पाहिलीय तो हेच म्हणेल की, बुमराह फक्त फिट नाहीय, तर तो पहिल्यापेक्षा जास्त घातक आणि अधिक वेगवान गोलंदाज बनलाय.