AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MS Dhoni | धोनीच्या आयुष्यावर दुसरा चित्रपट, ‘या’ तारखेला होणार रिलीज, कोण साकारणार धोनीचा रोल?

MS Dhoni | एमएस धोनीच्या आयुष्यावर दुसरा चित्रपट येत आहे. याआधी 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' चित्रपट प्रदर्शित झाला होता. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने धोनीच्या आयुष्यावरील या चित्रपटात धोनीची व्यक्तिरेखा साकारली होती.

MS Dhoni | धोनीच्या आयुष्यावर दुसरा चित्रपट, 'या' तारखेला होणार रिलीज, कोण साकारणार धोनीचा रोल?
MS dhoni-Sakshi dhoni
| Updated on: Jul 05, 2023 | 11:18 AM
Share

मुंबई : क्रिकेट विश्वात एमएस धोनीने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये एमएस धोनीची गणना होते. धोनी स्वत:हा उत्तम फिनिशरच आहेत. पण दुसऱ्यांकडून सर्वोत्तम कामगिरी करुन घेण्याचा गुण सुद्धा धोनीमध्ये आहे. त्यामुळेच क्रिकेट विश्वातीचल चणाश, हुशार कर्णधारांमध्ये धोनीची गणना होते. धोनी क्रिकेटच्या मैदानावर होता, त्यावेळी ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाला.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने धोनीच्या आयुष्यावरील या चित्रपटात धोनीची व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटामुळे धोनीच्या आय़ुष्यातील माहित नसलेले अनेक किस्से समजले.

धोनीची जादू अजूनही कायम

आता धोनीच्या आयुष्यावर दुसरा चित्रपट येत आहे. धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय. फक्त आयपीएलमध्ये धोनी खेळताना दिसतो. धोनी आता पूर्वीसारखा फार क्रिकेट खेळत नाहीय. पण क्रिकेट प्रेमींवर त्याची जादू अजूनही कायम आहे. यंदाच्या आयपीएल 2023 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने विजेतेपद मिळवलं. हे सीएसकेच पाचव विजेतेपद आहे.

कधी रिलीज होणार चित्रपट?

आता धोनीच्या आयुष्यावर दुसरा चित्रपट येतो आहे. ‘मिस्टर एंड मिसेस माही’ या चित्रपटाच नाव आहे. शरण शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. 15 मार्च 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा निर्माता कोण?

राजकुमार राव धोनीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. जान्हवी कपूर महीमा म्हणजे साक्षी धोनीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा धोनीचा प्रवास मांडण्यात येणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 मध्ये T20 आणि 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला. 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. धर्मा प्रोडक्शनने सोशल मीडियावर चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. करण जोहरची कंपनी या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.