AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवी शास्त्रींपाठोपाठ आणखी एक दिग्गज भारतीय संघापासून वेगळा होणार, ‘हे’ आहे कारण

आगामी टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघात बरेच बदल होणार आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री पदावरुन उतरणार आहेत. तर विराट कोहली टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार आहे.

रवी शास्त्रींपाठोपाठ आणखी एक दिग्गज भारतीय संघापासून वेगळा होणार, 'हे' आहे कारण
विराट कोहली, एम एस धोनी आणि रवी शास्त्री
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 4:44 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट संघात (Team India) सध्या अनेक फेरबदल होत असून नुकतंच कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 विश्वचषकानंतर टी 20 संघाच्या कर्णधार पदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) हे देखील मुख्य प्रशिक्षक अर्थात हेड कोचच्या पदावर राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा कार्यकाळ संपला असून त्यांना तो वाढवण्यात रस नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यानंतर आता भारतीय संघाचे स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग प्रशिक्षक निक वेब (Nick Webb) हेही वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाची साथ सोडणार आहेत.

न्यूझीलंडचे निक वेब हे न्यूझीलंडमध्ये लागलेल्या कोरोनासंबधी नियमांममुळे हा निर्णय घेत असून अशा कठीण काळात फॅमिलाला वेळ देण्यासाठी हा निर्णय़ घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. 2019 च्या वर्ल्ड कपनंतर ते भारतीय संघासोबत जोडले गेले होते. याआधी त्यांनी न्यूझीलंडच्या महिला संघासह स्थानिक संघासोबत काम केलं होतं. त्यांच्या कार्यकाळातच भारती संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात क्वालिफाय केलं होतं. तसंच ऑस्ट्रेलियामध्येही अप्रतिम विजय मिळवला होता.

‘फॅमिलाला वेळ देणंही गरजेचं’

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपासून भारतीय संघासोबत असलेले निक वेब हे 8 महिन्यांहून अधिक काळ फॅमिलीपासून दूर राहिले आहेत. त्यावर बोलताना ते म्हणाले, ‘मागील 2 वर्ष मला भारताचं प्रतिनिधित्व करायचं सौभाग्य मिळालं. यावेळी संघ म्हणून आम्ही भरपूर गोष्टी मिळवल्या. आम्ही विजय आणि पराभव दोन्ही पाहिलं पण आमचं प्रदर्शन कायम स्पेशल होतं. पण आता फॅमिलाला वेळ देणंही गरजेचं असल्याने हा निर्णय घेत आहे.’

हे ही वाचा

IPL 2021: राजस्थानविरुद्ध तुफानी अर्धशतकानंतर बास्केटबॉल कोर्टमध्येही इशानची कमाल, पाहा VIDEO

T20 WC : भारत टी-20 विश्वचषक स्पर्धेचा प्रबळ दावेदार, मात्र ‘या’ तीन संघांचं तगडं आव्हान

VIDEO: भारीच! भारताला मिळाला वकार युनिससारखा गोलंदाज, आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या उम्रानची बोलिंग अॅक्शन एकदा पाहाच!

(After T20 World Cup nick webb will step down as indias strength and conditioning coach says to BCCI)

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.