AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: भारीच! भारताला मिळाला वकार युनिससारखा गोलंदाज, आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या उम्रानची बोलिंग अॅक्शन एकदा पाहाच!

सनरायजर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात हैद्राबादने विजय मिळवलाच पण सोबतच त्यांचा युवा गोलंदाज उम्रानने आयपीएलच्या पर्वातील सर्वात वेगवान चेंडूही टाकला.

VIDEO: भारीच! भारताला मिळाला वकार युनिससारखा गोलंदाज, आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या उम्रानची बोलिंग अॅक्शन एकदा पाहाच!
उम्रान मलिक
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 3:58 PM
Share

मुंबई: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वातील 52 वा सामना सनरायजर्स हैद्राबाद संघाने (SRH)  रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB) संघाला 4 धावांच्या फरकाने मात देत जिंकल. सोबतच हैद्राबादच्या एका खेळाडूने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. हैद्राबाद संघातून टी नटराजनच्या जागी खेळणाऱ्या युवा गोलंदाज उम्रान मलिकने (Umran Malik) सलामीच्या सामन्यात केकेआरविरुद्ध आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही भारतीय गोलंदाजापेक्षा वेगवान चेंडू टाकला होता. त्यानंतर आता आरसीबीविरुद्ध त्याने यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे.

उम्रान याने केकेआरविरुद्झ पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर तब्बल 150 kmph वेगाने चेंडू फेकला. आय़पीएलच्या इतिहासात कोणत्याही भारतीय गोलंदाजाला इतका वेगवान चेंडू फेकता आला नव्हता. त्यानंतर आता आरसीबीविरुद्ध त्याने 152.95 kmph वेगाने चेंडू फेकला. हा यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू आहे. याआधी केकेआरच्या लॉकी फर्ग्यूसन (152.75 kmph) याच्या नावावर हा रेकॉर्ड होता. या कामगिरीनंतर उम्रानचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसंच उम्रानची बोलिंग अॅक्शन पाकिस्तानचा दिग्गज माजी गोलंदाज वकार यूनिस (Waqar Younis) सारखी असल्याने त्याचं अजूनच कौतुक होत आहे.

उम्रानची अॅक्शन अगदी वकारसारखी

भारताचे माजी कर्णधार आणि सलामीवीर के. श्रीकांत यांच्या मते भारताला एक शानदार वेगवान गोलंदाज मिळाला आहे. ते त्यांच्या यूट्यूब चॅनेल ‘चीकी चीका’ वर मलिकचं कौतुक करताना म्हणाले, “मलिकचं रन-अप त्यांना पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार यूनिसची आठवण करुन देतं.” दरम्यान एका ट्विटर अकाऊंटवर उम्रान आणि वकार यांच्या गोलंदाजीचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. जो पाहून तुम्हालाही हे पटेल…

आयपीएलमधील सर्वात वेगवान गोलंदाज (भारतीय)

उम्रान मलिक (सनरायजर्स हैद्राबाद) – 150.06kmph

मोहम्मद सिराज (आरसीबी) – 147.68kmph

मोहम्मद सिराज (आरसीबी) – 147.67kmph

खलिल अहमद (सनरायजर्स हैद्राबाद)- 147.38kmph

उम्रान मलिक (सनरायजर्स हैद्राबाद) – 146.84kmph

कोण आहे उम्रान मलिक?

सनरायजर्स हैद्राबाद संघाचा (SRH) खेळाडू आणि भारताचा गोलंदाजा टी नटराजन (T Natrajan Corona Positive) याला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे उम्रान मलिक याला टी नटराजनच्या जागी संघात घेण्यात आलं. उम्रान हा जम्मू आणि काश्मीर संघातील खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत एक टी20 आणि लिस्ट A सामने खेळले असून त्यामध्ये 4 विकेट्स घेतले आहेत. तो सध्या सनरायजर्स हैद्राबाद संघाचा नेट बोलर म्हणून खेळत असताना आता त्याला संघातही स्थान मिळालं आहे.

हे ही वाचा

शोएब अख्तरचा वेग अजूनही तसाचं, मैदानावर पुन्हा उतरत भेदक गोलंदाजी, पाहा VIDEO

IPL 2021: राजस्थानविरुद्ध तुफानी अर्धशतकानंतर बास्केटबॉल कोर्टमध्येही इशानची कमाल, पाहा VIDEO

T20 WC : भारत टी-20 विश्वचषक स्पर्धेचा प्रबळ दावेदार, मात्र ‘या’ तीन संघांचं तगडं आव्हान

(SRH Pacer Umran Malik bowls fastes ball in IPL 2021 hes action is like legend waqar younis)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.