Video : मोहम्मद सिराजकडून अपेक्षा; पण आकाश दीप इंग्लंडवर भारी! संधी मिळताच केली अशी कामगिरी

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामन्याचा दुसरा दिवस सुरु आहे. पहिल्या डावात भारताने 587 धावांचा मोठा डोंगर रचला आहे. या सामन्यात सिराज हा अनुभवी गोलंदाज आहे. पण त्याच्यापेक्षा आकाश दीप सरस ठरल्याचं दिसत आहे.

Video : मोहम्मद सिराजकडून अपेक्षा; पण आकाश दीप इंग्लंडवर भारी! संधी मिळताच केली अशी कामगिरी
Video : मोहम्मद सिराजकडून अपेक्षा; पण आकाश दीप इंग्लंडवर भारी!
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 03, 2025 | 10:15 PM

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला दुसरा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. पहिल्या सामन्यात खोऱ्याने धावा करूनही भारताला सामना गमवण्याची वेळ आली होती. सुमार गोलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षणामुळे हातात असलेला सामना गमवावा लागला. जसप्रीत बुमराह वगळता इतर गोलंदाज प्रभावी ठरले नाहीत. त्यात मोहम्मद सिराज तर खूपच महागडा ठरला. त्यामुळे क्रीडाप्रेमी आणि माजी क्रिकेटपटूंच्या रडारवर आला आहे. असं असताना दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला आराम दिल्याने सिराजकडून फार अपेक्षा आहेत. भारताने दुसऱ्या कसोटीतही नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. भारताने पहिल्या डावात दमदार फलंदाजी केली. सर्व गडी गमवून 587 धावांचा डोंगर रचला. भारताच्या या खेळीमुळे आता गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. जसप्रीत बुमराह नसल्याने जबाबदारी वाढली आहे. असं असातना इंग्लंडच्या फलंदाजांना आकाश दीपचा पेपर कठीण गेल्याचं दिसत आहे.

जसप्रीत बुमराह नसल्याने कर्णधार शुबमन गिलने पहिलं षटक आकाश दीपकडे सोपवलं. पहिल्या षटकातच इंग्लंडचा आक्रमक पवित्रा दिसला. आकाश दीपने पहिल्याच षटकात 12 धावा दिल्या. त्यामुळे आकाश दीपकडून फार अपेक्षा करणं कठीण असं वाटतं होतं. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकताना आकाश दीप इंग्लंडवर भारी पडला. पहिले तीन चेंडू निर्धाव टाकले. चौथ्या चेंडूवर डकेटची विकेट मिळाली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ओली पोपला आला तसा पाठवला. सलग दोन चेंडूवर दोन विकेट घेतल्या.

दरम्यान, सिराजने आर अश्विनचा सल्ला ऐकलेला दिसत आहे. विकेट नाही मिळाली तरी धावगती कमी करण्याचं त्याचा प्रयत्न यशस्वी दिसला. त्याच्या प्रयत्ना त्याला एक विकेटही मिळाली. सलामीला आलेल्या झॅक क्राउलीला बाद करण्यात यश आलं. त्याने 30 चेंडूत 19 धावा केल्या आणि तंबूत परतला. भारताने प्रभावी गोलंदाजी केली नक्कीच इंग्लंडवर फॉलोऑनची नामुष्की ओढावू शकते. पण भारतीय गोलंदाजांना कायम मधली फळी आणि शेपटाचे फलंदाज डोकेदुखी ठरले आहेत.