AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG : कोणाच्याच लक्षात नाही आलं ते आनंद महिद्रांनी हेरलं, विराटबाबतचं ते ट्विट व्हायरल

Anand Mahindra on Virat Kohli : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये दोन सुपर ओव्हरनंतर विनर मिळाला. या सामन्यात विराट शून्यावर आऊट झाला तरी त्याची चर्चा होत आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी विराटसाठी ट्विट केलं आहे.

IND vs AFG : कोणाच्याच लक्षात नाही आलं ते आनंद महिद्रांनी हेरलं, विराटबाबतचं ते ट्विट व्हायरल
| Updated on: Jan 19, 2024 | 9:14 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील तिसरा टी-20 सामना सर्वांच्या लक्षात राहण्यासारखा आहे. सामना एकदम श्वास रोखून धरणारा होता. कारण या सामन्यात एक नाहीतर दोन सुपर ओव्हर झाल्या होत्या. शेवटी टीम इंडियाने विजय मिळवत मालिका 3-0 ने जिंकली. या सामन्यामध्ये विराट कोहलीची बॅटींग चालली नाही मात्र गड्याने फिल्डिंगमधून सर्वांची मनं जिंकलीत. विराटने जो सिक्सर अडवला त्याच्यावर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले आनंद महिंद्रा?

विराट कोहली याचा सिक्स अडवतानाचा फोटो शेअर करत, हॅलो, आयझॅक न्यूटन? भौतिकशास्त्रामध्ये गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्ध असणारी  नवीन व्याख्या सांगू शकता का? असं मजेशीर ट्विट आनंद महिंद्र यांनी केलं आहे. सोशल मीडियावर हे ट्विट तुफान व्हायरल होत आहे.

आनंद महिद्रांनी असं ट्विट का केलं?

अफगाणिस्तान आणि टीम इंडियामधील तिसरा सामना चुरशीचा सुरू होता. टीम इंडियाने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग अफगाणी खेळाडू चौकार षटाकारांचा पाऊस पाडत करत होते. सामना एकतर्फी झाल्यासारखा वाटत होता. सामन्याच्या 17 ओव्हरमध्ये असाच एक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात होता. हा बॉल सिक्स जाणार हे फिक्स वाटत होतं पण त्यावेळी फिल्डिंग करत असलेल्या विराटने उडी मारत चेंडू अडवत आत फेकला. विराटच्या या फिल्डिंगचं कौतुक होत आहे. आनंद महिंद्रा यांनी याच फिल्डिंगवरून मजेशीर ट्विट केलं आहे.

दरम्यान, तिसऱ्या सामन्यात दोन सुपर ओव्हर पाहायला मिळाल्या. दोन्ही सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्मा याने दमदार फलंदाजी केली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्येही रोहितने केलेल्या दहा धावा सोडल्यावर दोन नंबरला आलेला संजू बिट झाला आणि रोहित रन आऊट झाला. मात्र रवी  बिश्नोई याने दोन विकेट घेत सामना संपवला. अखेर दोन सुपर ओव्हरनंतर टीम इंडियाला जिंकण्यात यश आलं.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....