AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौरव गांगुली की सचिन तेंडुलकर! कोणाची पत्नी शिक्षणात पुढे? जाणून घ्या एका क्लिकवर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटमधील दादा सौरव गांगुली यांनी एक काळ क्रिकेटचा गाजवला. त्यामुळे त्यांची ख्याती सर्वदूर आहे. असं असताना त्यांच्या पत्नींची चर्चाही होत आहे. चला जाणून घेऊयात या दोघांपैकी कोण शिक्षणात पुढे ते

सौरव गांगुली की सचिन तेंडुलकर! कोणाची पत्नी शिक्षणात पुढे? जाणून घ्या एका क्लिकवर
सौरव गांगुली की सचिन तेंडुलकर! कोणाची पत्नी शिक्षणात पुढे? जाणून घ्या एका क्लिकवरImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 08, 2025 | 9:49 PM
Share

सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या शिक्षणाचा तसा काही प्रश्नच येत नाही. कारण या दोघांनी क्रिकेटमध्ये पीएचडी केली आहे. कागदोपत्री नसली तर क्रिकेटच्या मैदानात चाहत्यांनी त्यांच्या खेळीसाठी गुण दिले आहेत. पण त्यांच्या पत्नी किती शिकलेल्या आहेत याबाबत मात्र उत्सुकता आहे. सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुली आणि सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर या दोघी कायम चर्चेत असतात. आता दोघांपैकी कोणाकडे सर्वात जास्त डिग्री आहेत असा प्रश्न चाहते विचारतात. तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल. सौरव गांगुलीची पत्नी डोना प्रोफेसर आहे. सचिन तेंडुलकरची पत्नी व्यवसायाने डॉक्टर आहे. त्यामुळे दोघांचा व्यवसायावरून त्यांच्या शिक्षणाचा अंदाज ठरवता येईल.

सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुली 2012 पासून भवानीपूर एज्युकेशन सोसायटी कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. तसेच तिला नृत्याचीही आवड आहे. त्यामुळे ती नृत्य अकादमीही चालवते. यात मुलांना ती शास्त्रीय नृत्याचे धडे देते. डोना गांगुली यांनी पदव्युत्तर शिक्षणानंतर जाधवपूर विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये एम फील आणि पीएचडी केली आहे. 1997 मध्ये सौरव गांगुलीने डोना यांच्याशी लग्न केले. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव सना गांगुली आहे. सौरव गांगुली एका राजघराण्यातील असून आज तो त्याचा व्यवसाय सांभाळत आहे.

सचिन तेंडुलकरची पत्नी अंजलीने बॉम्बे इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जेते ग्रुप ऑफ हॉस्पिटलमधून पुढील शिक्षण घेतलं. तिने एमबीबीएस पदवी घेतली असून मुंबई विद्यापीठातून बालरोगशास्त्रात सुवर्णपदाक विजेती आहे. सचिन आणि अंजली यांचं पहिल्याच नजरेत प्रेम जडलं होतं. दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना विमानतळावर पाहिले आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. 24 मे 1995 रोजी अंजली आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी लग्न केले. तेव्हा सचिन अवघ्या 22 वर्षांचा होता तर अजंली 28 वर्षांची होती. ती त्याच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे.

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.