Video : अनुष्का शर्माने विराट कोहलीला केलं ‘आऊट’, रागाच्या भरात थेट मैदान सोडत म्हणाला…

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या जोडीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना खूपच आवडला. कारण या व्हिडीओत क्रिकेटच्या मैदानात दोघांमध्ये जुलगबंदी पाहायला मिळाली. इतकंच काय तर अनुष्काने विराट कोहलीला बाद केलं आणि मग काय झालं ते जाणून घ्या

Video : अनुष्का शर्माने विराट कोहलीला केलं 'आऊट', रागाच्या भरात थेट मैदान सोडत म्हणाला...
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 8:08 PM

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे कोट्यवधी चाहते आहेत. विराट कोहलीची क्रिकेटमधील ओळख किंग म्हणून आहे. तर अनुष्का शर्माही अभिनयासह क्रिकेटची माहिती ठेवते. आता या दोघांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात दोघांमध्ये क्रिकेटवरून तू तू मै मै झाल्याचं दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि गल्ली क्रिकेटमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे बॅट हातात घेतल्यानंतर पहिल्यांदा नियम माहिती असणं गरजेचं आहे, असं अनुष्का शर्मा म्हणाली. त्याबाबत अनुष्का शर्मा विराट कोहलीला समजावून सांगत होती. पण विराट कोहली म्हणाला, मला क्रिकेटचे सर्व नियम माहिती आहेत. त्यामुळे या दोघांच्या सामन्यात प्रत्येक चेंडूनंतर काही ना काही घडत होतं. या व्हिडीओच्या सुरुवातीला अनुष्का शर्मा नियमांची यादी वाचून दाखवत आहे. यातील पहिला नियम असा की, तीनवेळा बॅटला बॉल लागला नाही तर आऊट असेल. दुसऱ्या नियमानुसार, तीनवेळा बॉल अंगाला लागला तरी आऊट असेल. हे नियम ऐकून विराट कोहलीला राग आला. मग नियम नंबर तीन ऐकून राग शांत झाला. कारण नुसता राग दाखवला तरी आऊट असेल असा हा नियम होता. नियम नंबर 4 सांगताना अनुष्का म्हणाली ज्याची बॅट तो पहिल्यांदा फलंदाजी करेल. मग काय सामन्याला सुरुवात झाली.

अनुष्का शर्मा फलंदाजीसाठी उतरली. विराट कोहलीने गोलंदाजी टाकताना पहिल्याच चेंडूवर अनुष्काला त्रिफळाचीत केलं. मग पहिला चेंडू ट्रायल असतो असं सांगत पुन्हा बॅटिंगला सुरुवात केली. मग दुसऱ्या चेंडूवर बाद झाल्यानंतर काहीच कारण सांगता आलं नाही. मग अनुष्का गोलंदाजीसाठी आली. पहिल्याच चेंडूवर विराटने जोरदार फटका मारला आणि बॉल थेट बाहेर गेला. मग काय आणखी नियम तयार झाला. जो बॉल मारेल तोच आणेल.

अनुष्काच्या गोलंदाजीवर आणखी एक फटका मारला आणि म्हणाला की हा लस्सी शॉट होता. त्यानंतर अनुष्काने टाकलेला बॉल विराटच्या शरीराला लागला. त्यामुळे विराट कोहली स्टंप असलेल्या बॉक्सपासून थोडा दूर उभा होता. मग काय अनुष्काने बॉल टाकला आणि त्या स्टंपरुपी बॉक्सला लागला. तिने मग आऊट असल्याचं सांगताच विराट संतापला म्हणाला असं कसं आऊट..मग रागाच्या भरात मैदान सोडून जात होता. तेव्हा अनुष्काने आणखी एक नियम सांगितला की रागाने गेला तर आऊट..मग विराटला आणखी राग आणि म्हणाला मला नाही खेळायचं.

'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?.
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?.
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल.
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?.
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला...
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला....
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?.
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?.
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.