किती महाग आहे अक्षय खन्ना याने ‘धुरंधर’ मध्ये घातलेला गॉगल ? कोणती कंपनी बनवते ?
अभिनेता अक्षय खन्ना याला 'छावा'नंतर पुन्हा एक जोरदार कम बॅक सिनेमा मिळालेला आहे. 'धुरंधर' या चित्रपटातील त्याचे एण्ट्री साँग खूपच गाजत आहे. या चित्रपटातील त्याच्या काळ्या गॉगलची किंमत किती आहे याची चर्चा सुरु आहे.

अभिनेता अक्षय खन्ना याचा धुरंधर चित्रपट तुफान हिट झाला आहे. या चित्रपटातील त्याचे एण्ट्री साँग Fa9la (फस्ला) सोशल मीडियावर गाजत आहे.या गाण्याच अक्षय खन्ना हा काळ्या सुटमध्ये दिसत आहे. जो आपल्या कारमधून शानदार अंदाजात उतरतो. एका छोट्या कार्यक्रमात प्रवेश करतो. सर्व जण त्याचे स्वागत करतात. सर्वांना सलाम करत तो मस्त अंदाजात नाचतो. हा चित्रपट पाहताना त्याच्या स्टायलिश गॉगलकडे चाहत्यांचे लक्ष वेधले केले आहे. या चष्म्याची किंमत काय आहे आणि कोणती कंपनी त्याला तयार करते ? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
गॉगलची किंमत काय ?
इंटरनेटवर या गॉगलची जास्त माहिती उपलब्ध नाही. परंतू सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिट (reddit) वर एका यूजरने अक्षय खन्ना याच्या चष्म्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्या युजरच्या पोस्टवर अनेकांच्या कमेंट आल्या आहेत. काही युजरने सांगितले की हा गॉगल GIGI Studios कंपनीचा आहे. रेडिटवर एका यूजरने सांगितले की अक्षय खन्ना याने धुरंधरच्या एण्ट्री सॉन्गमध्ये चष्मा घातलेला आहे. परंतू GIGI Studios कंपनीने 6670/1 मॉडेलचा चष्म्याची किंमत सुमारे 25 हजार इतकी आहे.
स्पेनची आहे ही कंपनी –
GIGI Studios ही स्पेनची कंपनी आहे. ही कंपनी अनेक प्रकारचे चष्मे तयार करते. या कंपनीला आधी GIGI Barcelona नावाने ओळखले जाते. ही एक फॅमिली कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1962 मध्ये झाली होती. ही कंपनी 45 देशात आपले प्रोडक्ट विकते. या कंपनीची खास बाब म्हणजे ही कंपनी चष्म्याची फ्रेम हाताने तयार करते. चष्म्याची एक फ्रेम 100 स्टेपने तयार केली जाते.
अनेक सेलिब्रिटी करतात वापर
GIGI Studios चा चष्म्याला जगभरातील अनेक सेलिब्रिटी वापरतात. यात अमेरिकन अभिनेत्री Jessica Biel, ब्रिटन एक्टर आणि गायक Ed Westwick, अमेरिकन मॉडेल आणि अभिनेते Erin Wasson आदींचा या समावेश आहे. अक्षय खन्ना याच्या शिवाय मूळचे भारतीय अभिनेत्री बनिता संधू ( Banita Sandhu) हिला देखील GIGI Studios चा हा गॉगल घातलेले पाहिले आहे.
