AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरची टीम इंडियात एन्ट्री होणार?

अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या शक्यतेमागील कारणही तसंच आहे.

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरची टीम इंडियात एन्ट्री होणार?
| Updated on: Jan 09, 2023 | 7:22 PM
Share

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा (Sachin Tendulakr Son) अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) रणजी ट्रॉफीत शानदार एन्ट्री केली. मुंबईकडून संधी मिळत नसल्याने अर्जुनने गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. अर्जुनने हा निर्णय योग्य ठरवला. अर्जुनने पदार्पणाच्या सामन्यातच शानदार शतक ठोकलं आणि टीकाकारांना वडिलांप्रमाणेच बॅटनेच उत्तर दिलं. आता अर्जुनसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अर्जुनला टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या शक्यतेमागील कारणही तसंच आहे. (arjun tendulkar coach subrto banrjee has appointed in bcci selection committee)

बीसीसीआयने 7 जानेवारीला 5 सदस्यीय निवड समिती जाहीर केली. बीसीसीआयच्या सल्लागार समितीने या निवड समितीची निवड केली. चेतन शर्मा यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली. तर इतर 4 जणांमध्ये नॉर्थ झोनमधून चेतन शर्मा, श्रीधरन शरत य साऊथ झोन, सलिल अंकोल वेस्ट झोन, शिव सुंदर दास इस्ट झोन आणि सुब्रतो बॅनर्जी यांची सेंट्रल झोनमधून निवड समितीत निवड करण्यात आली.

सुब्रतो बॅनर्जी हा अर्जुनचा कोच राहिला आहे. आता सुब्रतो राय निवड समितीत आहे. त्यामुळे अर्जुनची टीम इंडियात सहजासहजी निवड होऊ शकते, असं म्हटलं जात आहे.

कोण आहे सुब्रतो बॅनर्जी?

सुब्रतोने टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. सुब्रतोने 1989-90 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण केलं होतं. ही पहिलीच मॅच सुब्रतोसाठी अखेरची मॅच ठरली. त्यानंतर सुब्रतोला संघात स्थान मिळालं नाही.

अर्जुनची कामगिरी

अर्जुनने रणजी ट्रॉफीत गोव्याकडून खेळताना 4 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं. अर्जुनने 9 टी 20 सामन्यांमध्ये 6.60 च्या इकॉनॉमीने 12 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आता अर्जुनला कधीपर्यंत टीम इंडियात संधी मिळते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दरम्यान अर्जुन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व करतोय. आयपीएलमध्येही अर्जुनचं पदार्पण रखडलंय. त्यामुळे आता अर्जुनचं आयपीएल पदार्पण आधी होतं की आंतरराष्ट्रीय पदार्पण होतं, हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.