AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Tendulkar: कर्नाटकने गोव्याच्या बॉलर्सन धुतलं, पण अर्जुनची प्रभावी गोलंदाजी

Arjun Tendulkar: रणजी सामन्यात कर्नाटकने धावांचा डोंगर उभा केलाय. पण अर्जुन तेंडुलकरने टीमला गरज असताना महत्त्वाची विकेट काढली.

Arjun Tendulkar: कर्नाटकने गोव्याच्या बॉलर्सन धुतलं, पण अर्जुनची प्रभावी गोलंदाजी
Arjun-Tendulkar Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Dec 28, 2022 | 6:34 PM
Share

पणजी: सध्या देशात रणजी सीजन सुरु आहे. अनेक युवा खेळाडू चमकदार कामगिरी करतायत. पण एका खेळाडूच्या प्रदर्शनाकडे मीडियाच विशेष लक्ष आहे. मैदानावरील त्याच्या कामगिरीच वृत्तांकन केल जातय. या खेळाडूच नाव आहे, अर्जुन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने अर्जुन सुरुवातीपासूनच प्रसिद्धीच्या झोतात आहे. अर्जुन तेंडुलकर मूळचा मुंबईचा आहे. पण मुंबई टीममध्ये तीव्र स्पर्धा असल्याने त्याने गोव्याची निवड केली. अर्जुन तेंडुलकर गोव्याच्या टीममधून रणजी सामने खेळतोय.

अर्जुनकडे गोलंदाज म्हणून पाहिलं जात होतं, पण आता….

अर्जुन तेंडुलकरच्या रणजी ट्रॉफी करिअरची सुरुवात धडाकेबाज झाली. त्याने डेब्यु मॅचमध्येच राजस्थान विरुद्ध शतक ठोकलं. या मॅचआधी अर्जुन तेंडुलकरकडे गोलंदाज म्हणून पाहिलं जात होतं. पण आता त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललाय. अर्जुन तेंडुलकरकडे ऑलराऊंडर खेळाडू म्हणून पाहिलं जातं.

झारखंड विरुद्ध निराशाजनक प्रदर्शन

अर्जुनने राजस्थान विरुद्ध चांगलं प्रदशर्न केलं. पण झारखंड विरुद्ध तो विशेष काही करु शकला नाही. कर्नाटक विरुद्ध सुरु असलेल्या रणजी सामन्यात त्याने आपली गोलंदाजीची ताकत दाखवून दिली.

गोव्याच्या गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी, पण अर्जुन….

गोव्यात सुरु असलेल्या या रणजी सामन्यात कर्नाटकने पहिल्या डावात 7 विकेट गमावून 603 धावा केल्या आहेत. गोव्याच्या गोलंदाजांच प्रदर्शन निराशाजनक होतं. पण अर्जुनने आपल्या बॉलिंगने प्रभावित केलं. त्याने 79 धावा देऊन 2 विकेट काढल्या.

कोणत्या दोन विकेट काढल्या?

अर्जुन तेंडुलकरने आर.समर्थची विकेट काढली. गोव्यासाठी हा विकेट महत्त्वाचा होता. त्याने 140 धावा फटकावल्या. त्याशिवाय अर्जुनने शुभांग हेगडेलाही आऊट केलं. अर्जुनच्या गोलंदाजीचा इकॉनमी रेट काय?

अर्जुनपेक्षा जास्त विकेट दर्शन मिसाळने काढल्या. त्याने 3 फलंदाजांना बाद केलं. गोव्याच्या सर्व गोलंदाजांमध्ये अर्जुनचा इकॉनमी रेट (3.0) सर्वात चांगला आहे. या मॅचमध्ये मनीष पांडेने अवघ्या 186 चेंडूत 208 धावा फटकावल्या. रणजी ट्रॉफीच्या सामन्यात मनीष पांडेने वनडे स्टाइल बॅटिंग केली. त्याने 11 षटकार आणि 14 चौकार लगावले. मनीष पांडे शेवटपर्यंत नाबाद होता.

Follow Us
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?