दुबईत अर्शदीपने या खेळाडूच्या इंग्रजीवरून उडवली खिल्ली! Video होतोय व्हायरल
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडू घाम गाळत आहेत. दुबईच्या आयसीसी अकादमीत भारतीय खेळाडूंनी सराव केला. यावेळी भारतीय खेळाडू आनंदात दिसले. तसेच इंग्रजीची खिल्लीही उडवली.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार 19 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. या स्पर्धेसाठी आठ संघ घाम गाळत आहेत. भारतीय संघही या स्पर्धेसाठी दुबईत पोहोचला असून जोरदार सराव करत आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेशशी होणार असून 20 फेब्रुवारीला आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय खेळाडू 16 फेब्रुवारीला दुबईत आयसीसी अकादमीत सराव करताना दिसेल. यावेळी भारतीय खेळाडूंनी तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. खेळाडू मौजमस्ती करत सराव करत होते. तर भारतीय खेळाडूंनी यावेळी इंग्रजीची खिल्लीही उडवली. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर खेळाडूंच्या सरावाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओची सुरुवात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने केली. त्याने आपल्या शैली व्हिडीओची सुरुवात केली.
अर्शदीप इंट्रो देत असताना हर्षित राणाने इंग्रजीत सांगितलं की, ‘आम्ही आयसीसी अकादमीत आहोत. येथे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सराव करत आहोत.’ तेव्हा अर्शदीप सिंगने हर्षित राणाच्या इंग्रजीवरून फिरकी घेतली. अर्शदीपने सांगितलं की, ‘एका महिन्यासाठी इंग्रजी संपली आहे.’ त्यानंतर ऋषभ पंतलाही हसू आवरलं नाही. अर्शदीप सिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
या सराव शिबिरात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी घाम गाळला. दोन्ही खेळाडूंना इंग्लंड विरूद्धच्या मालिकेत सूर गवसला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून चॅम्पियन्स ट्रॉफी फार अपेक्षा आहेत. दोन्ही खेळाडूंनी गोलंदाजांचा सामना केला. कोहलीने यावेळी फुटवर्कवर काम केल्याचं दिसून आलं. तर रोहित आणि पांड्याने वेगवेगळे शॉट्स खेळले. इतर खेळाडूंनी क्षेत्ररक्षणाचा सराव केला. तर विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला सराव दरम्यान हार्दिक पांड्याचा एक बॉल लागला.
