
गेल्या काही दिवसांपासून ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो चांगलाच चर्चेत आहे. या शोचे होस्ट रणवीर अलाहबादिया आणि समन रैना यांच्यावर सध्या जोरदार टीका होत आहे. या शोमध्ये आई-वडिलांवर अश्लील जोक केल्यामुळे संपूर्ण राज्यात रणवीर आणि समय विरोधात तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, दोन्ही सेलिब्रिटींच्या अडचणी पाहून टीम इंडियाचा एक खेळाडू घाबरला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आहे. त्याने नुकताच सोशल मीडियावर केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
अर्शदीप सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो अनेकदा त्याच्या चाहत्यांसाठी काहीतरी पोस्ट करत असतो. एका चाहत्याने त्याला स्नॅपचॅटवर मेसेज करून स्वत:चा रोस्ट शो सुरू करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अर्शदीप म्हणाला की, ‘नाही बेटा, आजकाल थोडे सावध राहावे लागेल.’ त्याचे उत्तर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. अर्शदीपने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोचा उल्लेख केला नसला तरी देखील अप्रत्यक्षपणे तो या शोबाबत सुरू असलेल्या वादावरून बोलत असल्याचा अनुमान लावला जात आहे.
LMAO ARSHDEEP 😭😭😭 pic.twitter.com/t0fVZmN09Z
— 𝑫𝒊𝒚𝒂𝒂🌙 (@d_stellarqueen) February 18, 2025
सोशल मीडियावर अर्शदीपच्या या उत्तराची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. एका यूजरने, ‘भाई सोशल मीडिया कसं काम करतंय ते कळतंय ना’ असे म्हटले आहे. अनेकजण अर्शदीपच्या सेंस ऑफ ह्यूमरची प्रशंसा करत आहेत.
His sense of humour bhaisaab 😭
— Lakshmi (@itzmeLaks) February 18, 2025
अर्शदीप सिंगबद्दल टीम इंडियाच्या खेळाडूंनी अनेकदा सांगितले आहे की तो संघातील सर्वात मजेशीर आणि मस्तीखोर खेळाडूंपैकी एक आहे. अर्शदीप खूप हसतो, विनोद करतो आणि खोड्या काढतो. याचे एक उदाहरण द्याचे झाले तर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने दुबईत भारतीय क्रिकेट संघाच्या पहिल्या सराव सत्राचा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या व्हिडिओची सुरूवात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने केली होती. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.