IND vs ENG : अर्शदीप सिंह टी 20i क्रिकेटचा किंग, युझवेंद्र चहलला पछाडत मोठा रेकॉर्ड ब्रेक
Arshdeep Singh Milestone IND vs ENG 1st T20i : अर्शदीप सिंहने इंग्लंडला झटपट 2 धक्के दिले. अर्शदीप दुसरी विकेट घेताच टीम इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20i मालिकेतील सलामीचा सामना हा कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पहिल्या सामन्यात टॉस जिंकत इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने मैदानात उतरताच अवघ्या काही मिनिटांमध्येच इतिहास घडवला आहे. अर्शदीप सिंह याने इंग्लंडला दुसरा झटका देत मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. अर्शदीप सिंह टीम इंडियाकडून टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. अर्शदीपने यासह युझवेंद्र चहल याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
अर्शदीपला या सामन्याआधी चहलला मागे टाकण्यासाठी 2 विकेट्सची गरज होती. अर्शदीपने सामन्यातील पहिल्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर फिलीप सॉल्ट याला आऊट केलं. विकेटकीपर संजू सॅमसन याने फिलीप सॉल्ट याला कॅच आऊट केलं. अर्शदीपने सॉल्टला भोपळाही फोडू दिला नाही. अर्शदीपने या विकेटसह चहलच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यामुळे अर्शदीपला इतिहास घडवण्यासाठी आणखी 1 विकेटची गरज होती.
अर्शदीपने त्याच्या कोट्यातील दुसऱ्या आणि सामन्यातील तिसऱ्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर बेन डकेट याला रिंकु सिंह याच्या हाती कॅच आऊट केलं. अर्शदीपने दुसरी विकेट घेतली आणि यासह युझवेंद्र चहलच्या 96 विकेट्सचा रेकॉर्ड ब्रेक केला. अर्शदीप यासह टीम इंडियासाठी टी 20i मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला.
अर्शदीपने चहलच्या तुलनेत 19 सामन्यांआधीच ही कामगिरी केली. चहलने 80 टी 20i सामन्यांतील 79 डावांमध्ये 96 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीपने 61 व्या सामन्यांतच ही कामगिरी करुन दाखवली आहे.
अर्शदीप सिंह टीम इंडियाचा नवा ‘सरदार’
🚨 𝑹𝑬𝑪𝑶𝑹𝑫 𝑨𝑳𝑬𝑹𝑻 🚨
Meet Team India’s leading wicket-taker in T20Is! 🇮🇳🤝
Arshdeep Singh, the young left-arm pacer, surpasses Yuzvendra Chahal by picking up the most wickets (97) in just 61 T20Is 🔝👊#ArshdeepSingh #T20Is #India #Sportskeeda pic.twitter.com/afGTYju2OC
— Sportskeeda (@Sportskeeda) January 22, 2025
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.