AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashes 2023 Video : भर मैदानात फिल्डिंग करणाऱ्या स्टिव्ह स्मिथची इंग्लंड फॅन्सकडून खिल्ली, केलं असं की…

Ashes 2023, ENG vs AUS : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया अॅशेस मालिका म्हणजे द्वंद्वच असतं. मैदानात खेळाडू आणि मैदानाबाहेर फॅन्सची जबरदस्त जुंपलेली असते. असंच काहीस पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पाहायला मिळालं.

Ashes 2023 Video : भर मैदानात फिल्डिंग करणाऱ्या स्टिव्ह स्मिथची इंग्लंड फॅन्सकडून खिल्ली, केलं असं की...
Ashes 2023 Video : भर मैदानात फिल्डिंग करणाऱ्या स्टिव्ह स्मिथची इंग्लंड फॅन्सकडून खिल्ली, केलं असं की...Image Credit source: AFP
| Updated on: Jun 20, 2023 | 3:44 PM
Share

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची अॅशेस कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिला कसोटीचे चार दिवस पूर्ण झाले असून सामना रंगतदार वळणावर आला आहे. या सामन्यात खेळाडू जीवाचं रान करून खेळताना दिसत आहे. सामना आपल्या बाजूने झुकावा यासाठी मैदानात एकमेकांना डिवचण्यापासून अनेक प्रकार घडतात. यात क्रिकेट फॅन्सही मागे नसतात. होम ग्राउंड असलं की फॅन्स विरोधी संघाला डिवचून सळो की पळो करून सोडतात. असंच काहीसं दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथसोबत कसोटीच्या चौथ्या दिवशी झालं. इंग्लंडच्या फॅन्सनी स्टीव्ह स्मिथची जबरदस्त खिल्ली उडवत एकत्रितपणे गाणं गायलं.

स्टीव्ह स्मिथ सीमारेषेवर फलंदाजी करत होता. तेव्हा त्याला डिवचण्यासाठी फॅन्स गाणं गाऊ लागले. ‘आम्ही तुला टीव्हीवर रडताना पाहिलं आहे’, असे गाण्याचे बोल होते. गाणं ऐकून स्टीव्ह स्मिथला हसू आवरता आलं नाही. मात्र या हसूमागे ती कटू आठवण जागी झाल्याचं जाणवलं. तसेच फॅन्सचा अंदाज पाहता स्मिथ हवालदिल झाला होता.

2018 मध्ये स्टीव्ह स्मिथ एका पत्रकार परिषदेत रडला होता. कारण की, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने सेंडपेपर प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिली होती. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू बेनक्रॉफ्ट सेंडपेपरच्या माध्यमातून चेंडू घासत असल्याचं कॅमेऱ्यात चित्रित झालं होतं. त्यानंतर या प्रकरणात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर सहभागी असल्याचं समोर आलं होतं.

या प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर जगभरातून क्रीडारसिक आणि आजी-माजी क्रिकेटपटूंनी टीकास्त्र सोडलं होतं. इतकंच काय तर स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बेनक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. तसेच स्मिथ या प्रकरणाचा खुलासा करताना पत्रकार परिषदेत रडला होता. स्टीव्ह स्मिथचं कर्णधारपद गेलं होतं. आात इंग्लंडच्या फॅन्सची त्याच्यावर निशाणा साधला.

पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथ 59 चेंडूत 16 धावा आणि दुसऱ्या डावात 13 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. इंग्लंडने पहिल्या डावात 393 धावांवर डाव घोषित केला होती. त्यानंतर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ 386 धावांवर सर्वबाद झाला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 7 धावांची आघाडी मिळाली.

दुसऱ्याा डावात ऑस्ट्रेलियाने 273 धावा केल्या आणि विजयासाठी 280 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियन संघाने चौथ्या दिवसापर्यंत 3 गडी गमवून 107 धावा केल्या आहेत. अजून विजयासाठी 174 धावांची आवश्यकता आहे.

ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....