
आयपीएल 2025 स्पर्धेत गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा 38 धावांनी पराभव केला. या विजयासह गुजरात टायटन्सने प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. नाणेफेकीचा कौल गमवल्याने गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 224 धावा केल्या आणि विजयासाठी 225 धावांचं आव्हान दिलं. कर्णधार शुबमन गिलने 38 चेंडूत 76 धावा, तर जोस बटलरने 37 चेंडूत 64 धावांची खेळी केली. तर साई सुदर्शनचं अर्धशतक फक्त 2 धावांनी हुकलं. त्याने 23 चेंडूत 48 धावांची खेळी केली. तसेच पहिल्या विकेटसाठी शुबमन गिलसोबत 87 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्माने 225 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात करून दिली. त्याने 74 धावांची खेळी केली. पण जिथपर्यंत मैदानात होता तिथपर्यंत गुजरात टायटन्सची धाकधूक वाढली होती. पण प्रशिक्षक आशिष नेहरा डगआऊटमधून सूचना देत सूत्र हलवत होता.
आशिष नेहरा डगआऊटमधून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध सिराजला थेट सूचना देत होता. बाउंसर चेंडू टाकण्याचा सूचना देत होता. त्याच्या सूचनांचं पालन केल्याने या दोन्ही गोलंदाजांना फायदा झाला. मोहम्मद सिराजने 4 षटकात 8 निर्धाव चेंडू टाकले. मोहम्मद सिराजने 4 षटकात 33 धावा देत 2 गडी बाद केले. तर प्रसिद्ध कृष्णाने 4 षटकात 19 धावा देत 2 गडी बाद केले. दरम्यान, प्रसिद्ध कृष्णा हा पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याने 10 सामन्यात 19 गडी बाद केले आहेत. यात 41 धावांवर 4 गडी बाद ही सर्वोत्तम गोलंदाजी ठरली आहे.
Ashish Nehra trying to say umpire pagal hai🤣 pic.twitter.com/EcXBSaZ2Ab
— Pappu Plumber (@tappumessi) May 2, 2025
गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून टॉप 4 मध्ये एन्ट्री घेतली आहे. गुजरात टायटन्स 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सने उर्वरित चार पैकी एका सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल. तर सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफची काठावरची शक्यता आहे. पण एक पराभव होताच या सर्व आशा मावळणार आहेत. इतकं काय तर पंजाब किंग्सने विजय मिळवला. तर पंजाब किंग्स प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट होईल.