Asia Cup 2023 | टीम इंडिया विरुद्धच्या महामुकाबल्याआधी पाकिस्तानला झटका, शाहिन अफ्रिदी याला दुखापत

India vs Pakistan Asia Cup 2023 | साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याकडे लागलं आहे. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी हे 2 सप्टेंबरला आमेनसामने असणार आहे. त्याआधी शाहिन अफ्रिदीला दुखापत झाली आहे.

Asia Cup 2023 | टीम इंडिया विरुद्धच्या महामुकाबल्याआधी पाकिस्तानला झटका, शाहिन अफ्रिदी याला दुखापत
| Updated on: Aug 31, 2023 | 4:08 PM

कोलंबो | पाकिस्तानने आशिया कप 2023 मध्ये विजयाने सुरुवात केली. पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात नवख्या नेपाळ टीमवर 238 धावांनी मोठा विजय मिळवला. पाकिस्तानचा हा नेपाळ विरुद्धच्या पहिलाच विजय ठरला. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम इफ्तिखार अहमद या दोघांनी शतक ठोकत टीमला 300 पार पोहचवलं. तर त्यानंतर शादाब खान आणि शाहिनी अफ्रिदी या दोघांनी बांगलादेशचा कार्यक्रम केला. आता पाकिस्तानला आणखी एक सामना जिंकून थेट सुपर 4 मध्ये पोहचण्याची संधी आहे. पाकिस्तानचा पुढील सामना हा हायव्होल्टेज असणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबरला हा महामुकाबला होणार आहे. त्याआधी पाकिस्तानच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा हुकमाचा एक्का असलेला स्टार बॉलर शाहिन अफ्रिदी याला दुखापत झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान टीममध्ये चिंतेचं वातावरण दिसून येत आहे.

नक्की काय झालं?

शाहिन अफ्रिदी याला नेपाळ विरुद्धच्या सामन्यात त्रास जाणवला. शाहिनला त्रास होत असल्याने मैदानातून बाहेर गेला. शाहीन मैदानाबाहेर गेल्याने त्याला दुखापत झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र शाहिनला दुखापत झाली आहे की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शाहिन मैदानाबाहेर गेल्याने पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा आहे. शाहिनने मैदान सोडल्यानंतर टीम फिजिओ आणि डॉक्टरांसोबत चर्चा केली. आता शाहिनच्या दुखापतीबाबत काय माहिती समोर येते, त्यावर पाकिस्तानच्या बॉलिंगचं भवितव्य अवलंबून आहे.

शाहिनमुळे पाकिस्तान टेन्शमध्ये


आशिया कप 2023 साठी भारतीय क्रिकेट संघ | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).

आशिया कपसाठी पाकिस्तान टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.