Dunith Wellalage ने मनं जिंकली, टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणाला…..
Dunith Wellalage India vs Sri Lanka | टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या 20 वर्षीय युवा दुनिथ वेललागे याने ऑलराउंड कामगिरी केली. दुनिथने या कामगिरीसह क्रिकेट विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.

कोलंबो | टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात श्रीलंका क्रिकेट टीमवर आशिया कप सुपर 4 मधील सामन्यात 41 धावांनी मात केली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 50 ओव्हरमध्ये 214 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला गुंडाळलं. टीम इंडियाने श्रीलंकेला 41. 3 ओव्हरमध्येच 172 धावांवर ऑलआऊट केलं. टीम इंडियाने या विजयासह आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. टीम इंडियाने हा सामना जिंकला असला तरी खऱ्या अर्थाने श्रीलंकेच्या 20 वर्षीय युवा दुनिथ वेललागे याने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकलीत. दुनिथने श्रीलंकेच्या पराभवानंतरही मनाचा मोठेपणा दाखवलाय. ज्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होतंय.
नक्की काय झालं?
दुनिथने या सामन्यात ऑलराउंड कामगिरी केली. दुनिथने आधी बॉलिंग करताना 5 विकेट्स घेतल्या. दुनिथची आपल्या वनडे कारकीर्दीत 5 विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. त्यानंतर टीम अडचणीत असताना दुनीथने 46 बॉलमध्ये 3 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने नाबाद 42 धावांची खेळी केली. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीनंतरही श्रीलंकेला विजय मिळवता आला नाही. मात्र श्रीलंकेच्या पराभवानंतर दुनिथने जे म्हटलंय त्यामुळे त्याने सर्वांच्या मनात घर केलंय.
दुनिथ काय म्हणाला?
Dunith Wellalage said, “first I want to congratulate team India on their fantastic win. Kuldeep Yadav bowled really well”. pic.twitter.com/Ti6Zou6Qpj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 12, 2023
दुनिथ काय म्हणाला?
“सर्वातआधी मी टीम इंडियाचं अभिनंदन करतो. टीम इंडियात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. मात्र दुर्देवाने आम्ही सामना गमावला. मात्र आमचा आणखी एक सामना बाकी आहे. या पुढील सामन्यात आम्हाला चांगली झुंज द्यायची आहे. कुलदीप यादव हा सर्वोत्तम बॉलर आहे. मी पॉझिटिव्ह माईंडने खेळण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या सहकाऱ्यांचा आणि कोचिंग स्टाफचा आभारी आहे. मला या सर्वांनी पाठिंबा दिला”, अशा शब्दात दुनिथने टीम इंडियाचं अभिनंदन केलं. तसेच कोचिंग स्टाफचे जाहीर आभार मानले. दुनिथने सामन्यानंतर पोस्ट मॅच शोमध्ये संवाद साधला. यावेळेस तो बोलत होता.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
