AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK, Asia Cup : वा रे पठ्ठ्या..! इशान किशन याची पाकिस्तान विरुद्ध जबरदस्त खेळी, ठोकलं सलग चौथं अर्धशतक

भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियाची आघाडीची फलंदाजी ढेपाळली. वेगवान माऱ्यासमोर आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. मात्र इशान किशनने जबरदस्त खेळी केली.

IND vs PAK, Asia Cup : वा रे पठ्ठ्या..! इशान किशन याची पाकिस्तान विरुद्ध जबरदस्त खेळी, ठोकलं सलग चौथं अर्धशतक
IND vs PAK, Asia Cup : पाच नंबर तर पाच, पठ्ठ्याने विराट-रोहितच्या दांड्या उडवणाऱ्यांना झुंजावत ठोकली फिफ्टी
| Updated on: Sep 02, 2023 | 6:24 PM
Share

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत टीम इंडियाने फलंदाजीचा निर्णय घेतला. आघाडीला आलेल्या रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र पावसाने हजेरी लावताच सर्वच लय बिघडली. शुबमन गिल तर बॅटला चेंडू लागावा म्हणून धडपड करताना दिसला. अपेक्षेप्रमाणे शाहीन आफ्रिदीने गोलंदाजी केली आणि रोहित शर्मा याला क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला विराट कोहलीही काही खास करू शकला नाही. अवघ्या 4 धावा करून तंबूत परतला. श्रेयस अय्यरही स्वस्तात बाद झाल्याने शुबमन गिलकडून अपेक्षा वाढल्या. पण तोही त्रिफळाचीत होत तंबूत परतला आणि इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्यावर जबाबदारी आली. त्यांनी ही जबाबदारी काही अंशी पार पाडली.

इशान किशनची झुंजार अर्धशतकी खेळी

पाचव्या गड्यासाठी इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर इशाननं खेळपट्टीवर जम बसवत. पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक झळकावलं. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाला धावसंख्येची गती राखता आली. इशान किशन याने 54 चेंडूत 50 धावांची खेळी केली. या खेळीत 6 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. भारताला मोठ्या खेळीची आवश्यकता असताना इशान किशन याने चांगली खेळी केली.

वनडे क्रिकेटमध्ये सलग चौथं अर्धशतक

इशान किशनने मागच्या चार वनडे इनिंगमध्ये अर्धशतकी खेळी केली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतील तिन्ही वनडे सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेत 46 चेंडूत 52 धावा, दुसऱ्या वनडेत 55 चेंडूत 55, तिसऱ्या वनडेत 64 चेंडूत 77 आणि आज पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तान | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ.

टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....