
आशिया कप 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील एकूण दुसरा सामना आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे.त्यामुळे दोन्ही संघांचा सलग दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. उभयसंघातील या हायव्होल्टेज सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीच कौल लागला आहे. पाकिस्तानने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या.
पाकिस्तान आणि टीम इंडिया दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही. दोन्ही संघांनी आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. याआधी दोन्ही संघांनी या स्पर्धेत प्रत्येकी 1-1 सामना खेळला आहे. टीम इंडियाने 10 सप्टेंबरला यूएईवर मात करत विजयी सलामी दिली होती. तर 12 सप्टेंबरला पाकिस्तानने ओमानवर विजय मिळवला होता. दोन्ही संघ आपल्या पहिल्या सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरली आहे. त्यामुळे रिंकू सिंह, अर्शदीप सिंह, जितेश शर्मा आणि हर्षित राणा या चौघांना दुसऱ्या सामन्यातही डच्चू मिळाला आहे.
आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबईत 3 टी 20i सामने झाले आहेत. या तिन्ही सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा फिल्डिंगचा निर्णय घेईल, असं वाटलं होतं. मात्र सलमानने बॅटिंगचा निर्णय घेतला. तर भारताचा कर्णधार सूर्यकमार यादव याने मला बॉलिंगचाच निर्णय घ्यायचा होता, असं म्हटलं.
पाकिस्तानने दुबईत टीम इंडिया विरुद्ध 3 पैकी 2 टी 20i सामने जिंकले आहेत. तर भारताला फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. त्यामुळे टीम इंडियाला दुबईत हा सामना जिंकून पाकिस्तानचा 2-2 ने हिशोब बरोबर करण्याची संधी आहे.
पाकिस्तान किती धावा करणार?
🪙 Pakistan win an important toss and elect to bat first!
How crucial will winning the toss prove to be for 🇵🇰 on a surface that has shown signs of movement?#INDvPAK #DPWorldAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/M2zZo0FaNL
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 14, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : साहिबजादा फरहान, सैम अयुब, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), फखर जमान, सलमान आघा (कॅप्टन), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम आणि अबरार अहमद.