AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Pakistan Updates And Score Asia Cup : टीम इंडियाचा दणदणीत विजय, पाकिस्तानवर दुबईत 7 विकेट्सने मात, कुलदीप यादव POTM

| Updated on: Sep 15, 2025 | 6:39 PM
Share

India vs Pakistan Asia Cup 2025 Highlights and Updates in Marathi : भारतीय संघाने यूएईनंतर पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. भारताने या सामन्यात सांघिक कामगिरीच्या जोरावर पाकिस्तान विरुद्ध धमाकेदार विजय साकारला. भारताचा पाकिस्तान विरुद्धचा दुबईतील हा दुसरा टी 20i विजय ठरला

India vs Pakistan Updates And Score Asia Cup : टीम इंडियाचा दणदणीत विजय, पाकिस्तानवर दुबईत 7 विकेट्सने मात, कुलदीप यादव POTM
Shivam Dube and Suryakumar Yadav IND vs PAKImage Credit source: Bcci x Account

आशिया कप 2025 स्पर्धेतील सर्वात मोठ्या सामन्यात रविवारी 14 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हे 2 चिर प्रतिद्वंदी आमनेसामने होते. उभयसंघातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता.  या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. पाकिस्तानकडून विजयासाठी मिळालेलं 128 धावांचं आव्हान भारताने 15.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं.  भारताचा टी 20i आशिया कप स्पर्धेच्या इतिहासातील पाकिस्तान विरुद्धचा दुसरा विजय ठरला.  तसेच भारताने या विजयासह सुपर 4 मधील प्रवेश निश्चित केला.

पहलगाम दहशतावादी हल्ल्यानंतर दोन्ही संघांत पहिल्यांदाच सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे या सामन्याला भारतीयांचा तीव्र विरोध होता. मात्र या तीव्र विरोधानांतरही हा सामना झाला आणि भारताने पाकिस्तानला लोळवलं. या विजयानंतर कर्णधार सूर्यकमार याने पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला. “आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबांच्या पाठीशी उभे आहोत.  हा विजय आमच्या सर्व सशस्त्र दलांना समर्पित करतो”,असं सूर्याने म्हटलं. 

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 15 Sep 2025 04:44 PM (IST)

    IND vs PAK : टीम इंडिया विरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या अडचणीत वाढ

    टीम इंडियाने पाकिस्तानचा  14 सप्टेंबरला 7 विकेट्सने धुव्वा उडवला. भारताने या विजयासह सुपर 4 मधील स्थान निश्चित केलं. तर दुसऱ्या बाजूला या पराभवानंतर पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाकिस्तानला आता सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे.  पाकिस्तान यूएई विरुद्ध आपला अखेरचा साखळी फेरीतील सामना खेळणार आहे.

  • 15 Sep 2025 04:14 PM (IST)

    भारत पाक महामुकाबल्यानंतरही सत्ताधारी-विरोधकांमध्ये सामना सुरुच

    टीम इंडियाने आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवला. पहलगाम हल्ल्यानंतर या सामन्याचं आयोजन करण्यात आल्याने देशवासियांचा तीव्र विरोध होता. मात्र त्यानंतरही हा सामना झाला आणि भारताने विजय मिळवला. मात्र या सामन्यानंतरही राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दीक सामना सुरुच आहे.

    दीड लाख कोटींचा जुगार खेळला गेला. कालच्या मॅचवर थुंकतो, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. यावरुन सत्ताधाऱ्यांनी राऊतांवर हल्लाबोल केला.

  • 15 Sep 2025 02:07 AM (IST)

    India vs Pakistan LIVE Updates Asia Cup : टीम इंडियाचा पुढील सामना केव्हा?

    टीम इंडिया आशिया कप 2025 स्पर्धेतील आपला तिसरा आणि शेवटचा सामना शुक्रवारी 19 फेब्रुवारीला होणार आहे. टीम इंडिया या सामन्यात ओमान विरुद्ध भिडणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यात ओमानवर मात करुन विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

  • 14 Sep 2025 11:43 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : कुलदीप यादवला मिळाला सामनावीराचा पुरस्कार

    कुलदीप यादवला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने 4 षटकात 18 धावा देत 3 गडी बाद केले. दोन विकेट सलग घेतल्याने पाकिस्तानचा संघ बॅकफूटवर गेला. मी माझ्या योजना आखल्या होत्या आणि त्या अंमलात आणल्या. पहिला चेंडू नेहमीच विकेट घेणारा असतो, फक्त त्या मानसिकतेसह जावे लागेल आणि विकेट घेणारा चेंडू राबवावा लागेल. फलंदाज कदाचित सेट असेल पण तो पहिल्यांदाच माझ्यासमोर येत आहे. तरीही मला माझ्या गोलंदाजीवर खरोखर काम करण्याची गरज आहे असे वाटते. कधीकधी मला वाटते की मी खूप जास्त व्हेरिएशन वापरतो.‘, असं कुलदीप यादव म्हणाला

  • 14 Sep 2025 11:17 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : भारताने पाकिस्तानला लोळवलं, चार षटकं राखून मिळवला विजय

    आशिया कप 2025 स्पर्धेच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 128 धावांचं आव्ाहन ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 3 गडी गमवून 16 व्या षटकात पूर्ण केलं. या विजयासह भारताने सुपर 4 फेरीत एन्ट्री मारली आहे.

  • 14 Sep 2025 11:08 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण

    टीम इंडियाने 100 धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी आणखी 28 धावांची गरज आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे ही जोडी मैदानात खेळत आहे. ही जोडी किती ओव्हरमध्ये सामना संपवते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 14 Sep 2025 11:05 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : टीम इंडियाला तिसरा झटका, तिलक वर्मा आऊट

    पाकिस्तानच्या सॅम अयुब याने टीम इंडियाला तिसरा झटका दिला आहे. सॅमने तिलक वर्मा याला आऊट केलं. तिलक आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 56 रन्सची पार्टनरशीप केली. तिलकने 31 बॉलमध्ये 31 रन्स केल्या.

  • 14 Sep 2025 10:33 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : पॉवर प्लेमध्ये टीम इंडियाच्या 2 बाद 61 धावा, विजयासाठी 67 धावांची आवश्यकता

    भारताने पॉवर प्लेच्या 6 षटकात दोन गडी गमवून 61 धावांची खेळी केली आहे. शुबमन गिल 10, तर अभिषेक शर्मा 31 धावांवर बाद झाला. तर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा मैदानात आहेत.

  • 14 Sep 2025 10:22 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : अभिषेक शर्मा 31 धावा करून तंबूत

    अभिषेक शर्माच्या रुपाने भारताला दुसरा धक्का बसला आहे. अभिषेक शर्माने 31 धावा केल्या आणि सैम अयुबच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकला. झेल बाद होत तंबूत परतावं लागलं.

  • 14 Sep 2025 10:14 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : टीम इंडियाला पहिला धक्का, शुबमन गिल 10 धावा करून बाद

    टीम इंडियाला पहिला धक्का बसला आहे. उपकर्णधार शुबमन गिल फक्त 10 धावा करून तंबूत परतला आहे. पुढे जाऊन फटकेबाजी करण्याच्या नादात विकेट दिली.

  • 14 Sep 2025 10:09 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : भारताची दमदार सुरुवात, अभिषेक शर्माचा चौकार षटकाराने श्रीगणेशा

    भारताने विजयासाठी दिलेल्या 128 धावांचा पाठलाग आक्रमक अंदाजात केला आहे. अभिषेक शर्माने शाहीन आफ्रिदीच्या पहिल्या दोन चेंडूवर चौकार-षटकार मारला.  भारताने पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात केली आहे.

  • 14 Sep 2025 09:46 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : पाकिस्तानचं भारतासमोर विजयासाठी 128 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

    पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 127 धावा केल्या आणि विजयासाठी 128 धावांचं आव्हान दिलं आहे. भारतीय संघाला हे आव्हान गाठणं सहज शक्य असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता भारत हे आव्हान किती षटकात आणि किती विकेट राखून जिंकते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • 14 Sep 2025 09:40 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : पाकिस्तानला नववा धक्का, सुफियान मुकीम बाद

    पाकिस्तानला नववा धक्का बसला असून सुफियान मुकीम बाद झाला आहे. त्यामुळे हा सामना पूर्णपणे भारताच्या पारड्यात असल्याचं दिसत आहे.

  • 14 Sep 2025 09:35 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : पाकिस्तानला आठवा झटका, फहीम अश्रफ आऊट

    वरुण चक्रवर्ती याने पाकिस्तानला आठवा झटका देत वैयक्तिक पहिली विकेट मिळवली आहे. वरुणने फहीम अश्रफ याला पाकिस्तानच्या डावातील 18 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर एलबीडब्ल्यू आऊट केलं.  फहीमने 14 बॉलमध्ये 11 रन्स केल्या.

  • 14 Sep 2025 09:27 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : पाकिस्तानला सातवा धक्का, साहिबजादा फरहान आऊट

    कुलदीप यादव याने पाकिस्तानला सातवा आणि मोठा झटका दिला आहे. कुलदीपने सेट बॅट्समन साहिबजादा फरहान याला आऊट केलं. कुलदीपने यासह तिसरी विकेट मिळवली. साहिबजादाने 3 सिक्स आणि 1 फोरसह 44 बॉलमध्ये 40 रन्स केल्या.

  • 14 Sep 2025 09:10 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : 2 बॉल, 2 विकेट्स, कुलदीपचा धमाका, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं

    टीम इंडियाचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव याने कमाल केली आहे. कुलदीपने पाकिस्तानच्या डावातील 13 व्या ओव्हरमधील चौथ्या आणि पाचव्या बॉलवर सलग 2 विकेट्स घेतल्या. कुलदीपने हसन नवाज आणि मोहम्मद नवाज या दोघांना आऊट केलं. यासह भारताने पाकिस्तानच्या 6 फलंदाजांना बाद केलं आहे.

  • 14 Sep 2025 09:01 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : सलमान आगा आऊट, पाकिस्तानला चौथा झटका

    टीम इंडियाचा फिरकीपटू अक्षर पटेल याने 10 व्या ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या बॉलवर पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगा याला आऊट केलं. पाकिस्तानने यासह चौथी विकेट गमावली. अक्षरने सलमानला अभिषेक शर्मा याच्या हाती 3 धावांवर कॅच आऊट केलं. अक्षरने यासह दुसरी विकेट मिळवली. तर पाकिस्तानने 10 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 49 धावा केल्या.

  • 14 Sep 2025 08:52 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : अक्षर पटेलने पाकिस्तानची सेट जोडी फोडली, फखर झमान आऊट

    हार्दिक, जसप्रीत बुमराह याच्यानंतर अक्षर पटेल याने वैयक्तिक पहिली विकेट घेत पाकिस्तानला तिसरा झटका दिला आहे. टीम इंडियाने पाकस्तानला पहिल्या 2 ओव्हरमध्ये 2 झटके दिले होते. त्यानंतर फखर झमान आणि साहीबजादा फरहान या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी करत पाकिस्तानला 45 पर्यंत पोहचवलं. मात्र अक्षरने आठव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर फखरला तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. फखरने 15 बॉलमध्ये 17 धावा केल्या.

  • 14 Sep 2025 08:39 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : पाकिस्तानच्या पावरप्लेमध्ये 7 च्या रनरेटने धावा, टीम इंडियाकडून 2 झटके

    टीम इंडियाने पाकिस्तानला पावरप्लेमधील 6 ओव्हरमध्ये एकूण 2 झटके दिले. हार्दिक पंड्या याने सॅम अयुब याला झिरोवर आऊट केलं. तर जसप्रीत बुमराह याने मोहम्मद हारीसला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. पाकिस्तानने पावरप्लेमध्ये 2 विकेट्स गमावून 42 धावा केल्या. साहिबदाजा फरहान आणि फखर झमान ही जोडी मैदानात खेळत आहे.

  • 14 Sep 2025 08:15 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : हार्दिकनंतर बुमराहला विकेट, पाकिस्तानला दुसरा आणि मोठा झटका

    टीम इंडियाने पाकिस्तानला दुसऱ्याच ओव्हरमध्ये दुसरा झटका दिला आहे. हार्दिक पंड्या याने सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानला पहिला झटका दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने दुसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्याच ओव्हरमध्ये विकेट मिळवली. बुमराहने मोहम्मद हारीस याला हार्दिक पंड्या याच्या हाती कॅच आऊट केलं. हारीसने 5 बॉलमध्ये 3 धावा केल्या.

  • 14 Sep 2025 08:03 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर धक्का, सैम अयुब बाद

    हार्दिक पांड्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानला धक्का बसला आहे. सैम अयुब पहिल्याच चेंडूवर बाद होत तंबूत परतला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. झेल पकडण्यात जसप्रीत बुमराहने कोणतीही चूक केली नाही.

  • 14 Sep 2025 07:51 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : पाकिस्तानने टॉस जिंकला, टीम इंडिया विरुद्ध बॅटिंगचा निर्णय, चौघांना डच्चू

    India vs Pakistan Toss Result : पाकिस्तानने टॉस जिंकला, टीम इंडिया विरुद्ध बॅटिंगचा निर्णय, चौघांना डच्चू, Playing 11 मध्ये कोण?

  • 14 Sep 2025 07:48 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : या खेळाडूंवर सूर्यकुमारचा विश्वास, प्लेइंग 11 बाबत म्हणाला...

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. हा निर्णय भारताच्या मनासारखा झाला. या सामन्यात भारताची प्लेइंग 11 निवडताना सूर्यकुमार यादवने अशी रणनिती आखली आहे.

    Asia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात या खेळाडूंवर सूर्यकुमारचा विश्वास, प्लेइंग 11 बाबत म्हणाला…

  • 14 Sep 2025 07:43 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : पाकिस्तानची प्लेइंग 11

    पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): साहिबजादा फरहान, सैम अयुब, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), फखर जमान, सलमान आघा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद

  • 14 Sep 2025 07:39 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : भारताची प्लेइंग 11

    भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

  • 14 Sep 2025 07:33 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम फलंदाजी घेतली

    पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला आहे. कारण भारतीय कर्णधारने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता असं बोलला.

  • 14 Sep 2025 07:13 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : सामन्यापूर्वी सैम अयुब काय म्हणाले?

    "आम्ही फक्त पाकिस्तान-भारत सामन्याची आतुरतेने वाट पाहत नाही, तर स्पर्धा जिंकण्यासाठीही उत्सुक आहोत.", असं सैम अयुब म्हणाला.

  • 14 Sep 2025 07:02 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : पाकिस्तान विरुद्धचा सामना कोण गाजवणार? कोण असेल पुढचा स्टार

    भारतासाठी रोहित शर्मा, विराट कोहली, तर पाकिस्तानमध्ये बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान नाही. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत नवा स्टार पाहण्याची ही एक संधी आहे. शुबमन गिलने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा आहेत.  तर पाकिस्तानकडून काही नावे समोर येतात,. पण बाबर-रिझवानसारखी छाप सोडेल असा खेळाडू नाही. त्यामुळे या सामन्यात कोण चांगली कामगिरी करतो याकडे लक्ष असेल.

  • 14 Sep 2025 06:47 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : भारत आणि पाकिस्तान आमनेसामने, थोड्याच वेळात टॉस

    भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना थोड्याच वेळात सुरु होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सकाळी 8 वाजता सुरू होईल. याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 7.30 वाजता टॉस होईल.

  • 14 Sep 2025 06:34 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : .... तर भारतीय संघ सुपर 4 फेरीत

    आशिया कप 2025 चा सहावा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे. हा सामना जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये पोहोचेल. भारत 2 गुणांसह ग्रुप ए मध्ये अव्वल स्थानावर आहे. भारताचा नेट रनरेटही चांगला आहे. तर पाकिस्तान दोन गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

  • 14 Sep 2025 06:21 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : भारत पाकिस्तान सामन्यात कोणाचं पारडं जड?

    सध्या भारत खूप मजबूत संघ आहे: सर्व स्वरूपांमध्ये, सर्व परिस्थितीत आणि विशेषतः टी20 मध्ये टीम इंडिया भक्कम आहे. मुक्तपणे फलंदाजी करण्यास आणि कोणत्याही किंमतीवर कठोर परिश्रम करण्यास संघ सज्ज आहे. माइक हेसनच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करीत आहे. पण तरीही संघ कमकुवत दिसत आहे. असे असले तरी, टी20 मध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानच्या तीन विजयांपैकी दोन दुबईमध्ये झाले आहेत.

  • 14 Sep 2025 06:08 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : शुबमन गिल खेळणार की नाही? असे आहेत अपडेट

    सामन्याच्या पूर्वसंध्येला पर्यायी सत्रादरम्यान शुबमन गिलला नेटमध्ये दुखापत झाली होती परंतु भारतीय उपकर्णधाराने थोड्या वेळानंतर फलंदाजी पुन्हा सुरू केली आणि तो ठीक दिसत होता.

  • 14 Sep 2025 05:54 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : पाकिस्तानची अशी असू शकते रणनिती

    पाकिस्तानच्या शेवटच्या दोन टी20 मालिका विजयांमध्ये मालिकावीर असलेला मोहम्मद नवाज गोलंदाजीत महत्त्वाचा असेल. 2025मध्ये त्याने ज्या चार मालिकांमध्ये भाग घेतला आहे त्यापैकी प्रत्येकी सरासरी 15 पेक्षा कमी आहे आणि प्रत्येकी सात पेक्षा कमी षटकात त्याने बळी दिले आहेत.

  • 14 Sep 2025 05:46 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : भारत-पाकिस्तान सामन्यात टॉस फॅक्टर किती महत्त्वाचा?

    दुबईत टॉस फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आलेल्या 3 टी 20I सामन्यात दुसऱ्या डावात बॅटिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. त्यामुळे टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

  • 14 Sep 2025 05:22 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : टीम इंडिया महामुकाबल्यासाठी सज्ज, सामन्याआधी सूर्यासेनेचा जोरदार सराव

    टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. उभयसंघातील सामना 14 सप्टेंबरला रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाने जोरदार सराव केला. बीसीसीआयने या सरावाचा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पाहा व्हीडिओ.

    टीम इंडियाचा जोरदार सराव

  • 14 Sep 2025 05:11 PM (IST)

    India vs Pakistan, Asia Cup : महामुकाबल्याला उरले फक्त 3 तास, टॉस किती वाजता?

    टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याला आता फक्त 3 तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. उभयसंघातील या हायव्होल्टेज सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.  हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करणयात आला आहे.

  • 14 Sep 2025 04:52 PM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : टीम इंडियासोबत आशिया कप स्पर्धेत 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं होणार

    टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाची ही 18 वर्षांत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशिवाय पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची पहिलीच वेळ असणार आहे. विराट आणि रोहितने टी 2OI क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने दोघेही या स्पर्धेचा भाग नाहीत.

  • 14 Sep 2025 04:22 PM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध, महामुकाबला रद्द होणार?

    भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला तीव्र विरोध केला जात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला हे या विरोधामागील प्रमुख कारण आहे. या हल्ल्यानंतरही केंद्र सरकारने पाकिस्तान विरुद्ध खेळण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे नाराजीचा सूर आहे. चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सामना रद्द करण्यात यावा, सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी घोषणाबाजी सोशल मीडियावर केली जात आहे. मात्र हा सामना आता रद्द होणार नसल्याचं स्पष्ट आहे.

  • 14 Sep 2025 03:48 PM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : महामुकाबल्याला तीव्र विरोध, तुम्ही भारत-पाकिस्तान सामना पाहणार का?

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही केंद्र सरकारने पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्याला परवानगी दिली. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. पहलगाम हल्ल्याच्या जखमा ओल्या असताना भारत पाकिस्तान विरुद्ध खेळणार असल्याचने या सामन्याला तीव्र विरोध केला जात आहे. त्यामुळे या सामन्यावर बहिष्कार घालावी, असं आवाहन सोशल मीडियावर केलं जात आहे. तुम्ही हा सामना पाहणार का? खालील लिंकवर क्लिक करुन तुम्ही तुमचं मत नोंदवा.

    भारत-पाक सामना पाहणार का?

  • 14 Sep 2025 03:21 PM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : भारत-पाकिस्तान सामन्याला जोरदार विरोध, हेड कोच गौतम गंभीरचा टीम इंडिया नेमका सल्ला

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत-पाकिस्तान सामन्याला वाढता विरोध पाहता टीम इंडियाचे खेळाडू हेड कोच गौतम गंभीर याच्याकडे गेले. गंभीरने या खेळाडूला मॅचवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. या विरोधामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंमध्येही गोंधळाची स्थिती आहे.

  • 14 Sep 2025 02:51 PM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : दुबईत टीम इंडिया-पाकिस्तान चौथ्यांदा आमनेसामने

    टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दुबईमध्ये चौथ्यांदा टी-20I सामन्यात आमनेसामने असणार आहेत. दुबईत आतापर्यंत झालेल्या 3 पैकी 2 सामन्यांमध्ये पाकिस्तानने विजय मिळवला आहे. तर भारताला एकदाच विजय मिळवण्यात यश आलंय. उभयसंघात या मैदानात झालेल्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर मात केली होती.

  • 14 Sep 2025 02:38 PM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : टीम इंडियासमोर पाकिस्तानच्या सलग 2 वेळा मॅन ऑफ द सीरिज राहिलेल्या ऑलराउंडरला रोखण्याचं आव्हान

    टीम इंडियासमोर रविवारी पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात सलग 2 वेळा मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूला रोखण्याचं आव्हान असणार आहे. मोहम्मद नवाझ याने गेल्या दोन्ही टी 20i मालिकांमध्ये मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार मिळवला आहे. त्यामुळे या ऑलराउंडरला झटपट रोखण्याचं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असणार आहे.

  • 14 Sep 2025 02:13 PM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन कशी असेल?

    पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याची योजना नसल्याचं असिस्टंट कोच रायन टेन डेस्काटे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे टीम इंडिया यूएई विरुद्धच्याच प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

    टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुबमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

  • 14 Sep 2025 02:11 PM (IST)

    पाकिस्तानसोबत क्रिकेट आणि व्यापार सध्यातरी नको : हरभजन सिंह

    आशिया कप सुरू झाला आहे. पण पाकिस्तान आणि भारताच्या क्रिकेट सामन्याबद्दल हरभजन सिंह यांनी स्पष्टच मत मांडलं आहे. पाकिस्तानसोबत क्रिकेट आणि व्यापार सध्यातरी नको असं हरभजन सिंह यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानसोबतचे संबंध सुरळीत होत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत सामना खेळू नये असंही हरभजन सिंह यांनी म्हटलं आहे.

  • 14 Sep 2025 01:42 PM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : भारत-पाकिस्तान सामन्याला तीव्र विरोध, टीम इंडियातही उभी फूट?

    आशिया कप 2025 स्पर्धेत आज 14 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याला तीव्र विरोध आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही या सामन्याचं आयोजन करण्यात आलेल्याने देशवासियांमध्ये संतापाची लाट आहे. भारताने हा सामना खेळू नये, असं सामान्य भारतीयांचं मत आहे. इतकंच नाही तर टीम इंडियातील काही खेळाडूंचा या सामन्यात खेळण्यासाठी विरोध असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे भारत-पाक सामन्यावरुन टीम इंडियातही 2 गट पडल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

  • 14 Sep 2025 01:12 PM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : भारत-पाकिस्तान सामन्यावरुन घमासान, सोशल मीडियावरुन महामुकाबल्यावर बहिष्कार घालण्याची तीव्र मागणी

    क्रिकेट चाहत्यांच्या तीव्र विरोधानंतरही आशिया कप 2025 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार असल्याचं स्पष्ट आहे. या सामन्याला सर्वच स्तरातून विरोध केला जात आहे.  हा सामना रद्द करावा, अशी मागणी केली जात आहे. आंदोलन आणि निदर्शनद्वारे सामना रद्द करण्याची तीव्र मागणी आहे. नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर बायकॉट इंडिया-पाकिस्तान मॅच #BoycottINDvPAK या हॅशटॅगद्वारे जोरदार विरोध केला जात आहे.

  • 14 Sep 2025 01:00 PM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर कोणत्या चॅनेल्सवर पाहायला मिळेल?

    टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्यासाठी क्रिकेट चाहते उत्सूक आहेत. या सामन्याला अवघ्या काही तासांनी सुरुवात होणार आहे. सामना रात्री 8 वाजता सुरु होईल. सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील अनेक चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच सामन्याची प्रत्येक अपडेट टीव्ही 9 मराठी वेबसाईटवर जाणून घेता येईल.

  • 14 Sep 2025 12:40 PM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : पाकिस्तानची ओमानवर मात करत विजयी सलामी

    पाकिस्तानने क्रिकेट टीमने 12 सप्टेंबरला नवख्या ओमान संघाला पराभूत करत आशिया कप स्पर्धेत विजयी सुरुवात केली. पाकिस्तानने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली. पाकिस्तानचा नेट रनरेट हा +4.650 इतका आहे.

  • 14 Sep 2025 12:33 PM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : भारत-पाकिस्तानचं मिशन सुपर 4, कोण मिळवणार सलग दुसरा विजय?

    भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी आशिया कप 2025 स्पर्धेत विजयी सुरुवात केली. भारताने यूएई तर पाकिस्तानने ओमानला पराभूत केलं.  सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी 2 सामने जिंकायचा आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान या दोन्ही संघांना हा सामना जिंकून सुपर 4 मध्ये पोहचण्याची समान संधी आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणता संघ हा सामना जिंकून सुपर 4 मध्ये सुरक्षितरित्या पोहचणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 14 Sep 2025 12:20 PM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : भारताची स्पर्धेत विजयी सुरुवात

    भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आशिया कप 2025 स्पर्धेतील आपली सुरुवात विजयाने केली आहे. भारताने या मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात यूएईवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताने 10 सप्टेंबरला झालेल्या सामन्यात 58 धावांचं आव्हान हे 9 विकेट्स राखून आणि अवघ्या 27 चेंडूत पूर्ण केलं. टीम इंडिया ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे.

  • 14 Sep 2025 12:00 PM (IST)

    उद्या आक्रोश मोर्चा

    गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवाभाऊ नावाने बॅनर लागले आहेत या सगळ्या जाहिरात कॅम्पेनिंग ला आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नाशिक मधील स्थानिक वृत्तपत्रातून उत्तर देण्यात आल आहे कारण आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक दिवसीय शिबीर नाशिक मधे पार पडत आहे आणि उद्या शरद पवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या समस्यांच्या संदर्भात नाशिक मधे भव्य असा आक्रोश मोर्चा होणार आहे या पाश्वभूमीवर आज वृत्तपत्रात देवा तू सांग ना?या आशयाचे जाहिरात देऊन मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर कधी मिळणार असा सवाल या जाहिरातीतून उपस्थित केला आहे

  • 14 Sep 2025 12:00 PM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : टीम इंडिया विरुद्ध आशिया कप हेड टु हेड रेकॉर्ड

    आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात एकूण 19 सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने पाकिस्तानला 10 वेळा पराभूत केलं आहे. तर पाकिस्तानने 6 सामने जिंकले आहेत. तर 3 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.

  • 14 Sep 2025 11:45 AM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : टीम इंडियाने दुबईत आतापर्यंत एकूण किती टी 20i सामने जिंकलेत?

    टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये 10 टी 20i सामने खेळले आहेत. भारताने 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर 6 वेळा भारताला पराभूत व्हावं लागलं आहे.

  • 14 Sep 2025 11:40 AM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरुन राजकारण पेटलं, संजय राऊतांचा जय शाह यांच्यावर आरोप काय?

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही केंद्र सरकराने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याला परवानगी दिली. काही तासांनी सामना होणार आहे. सरकारने पहलगाम हल्ल्यानंतरही सामन्याला परवानगी दिल्याने देशभरात विरोधकांकडून निदर्शन आणि आंदोलन करण्यात येत आहे.शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सामन्यावरुन गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

    टीम इंडियातील खेळाडूंवर पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्यासाठी जय शाह यांचा दबाव आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी पत्रकार परिषदेत त्यांचं काही क्रिकेटपटूंसह बोलणं झाल्याचं म्हटलं. भारताच्या काही खेळाडूंना पाकिस्तान विरुद्ध खेळायचं नाहीय, असा दावाही राऊतांनी केला.

  • 14 Sep 2025 11:30 AM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : पाकिस्तानने दुबईत आतापर्यंत एकूण किती टी 20i सामने जिंकलेत?

    पाकिस्तानने आतापर्यंत दुबईत एकूण 33 टी 20i सामने खेळले आहेत. पाकिस्तानने 33 पैकी 18 सामने जिंकले आहेत. तर 14 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एक सामना टाय झाला आहे.

  • 14 Sep 2025 11:12 AM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : भारत-पाकिस्तान दुबईमध्ये किती वेळा आमनेसामने?

    टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ दुबईत 3 वेळा टी 20i सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. पाकिस्तान दुबईत टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. पाकिस्तानने भारताला दुबईत 3 पैकी 2 सामन्यांत पराभूत केलं आहे. तर भारताला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे रविवारी भारताकडे पाकिस्तानचा हिशोब बरोबर करण्याची संधी आहे.

  • 14 Sep 2025 11:09 AM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : भारत-पाकिस्तानपैकी टी 20मध्ये वरचढ कोण? पाहा आकडे

    टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ टी 20i सामन्यांमध्ये 13 वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने या 13 पैकी सर्वाधिक 10 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत. आता रविवारी कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.

  • 14 Sep 2025 10:47 AM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : आशिया कप 2025 स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ

    सैम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद, हुसैन तलत, हसन अली, खुशदिल शाह, हरिस रौफ, मोहम्मद वसीम आणि सलमान वसीम.

  • 14 Sep 2025 10:46 AM (IST)

    India vs Pakistan Live Updates Asia Cup : आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघ

    अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, रिंकू सिंग आणि अर्शदीप सिंग.

  • 14 Sep 2025 10:45 AM (IST)

    India vs Pakistan LIVE Updates :भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांचं लक्ष, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

    आशिया कप 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान या संघात सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

Published On - Sep 14,2025 10:41 AM

Follow us
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.