IND vs SL Toss: श्रीलंका टॉसचा बॉस, कॅप्टन सूर्याचा फायनलआधी मोठा निर्णय, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
India vs Sri Lanka Super 4 Toss Asia Cup 2025 : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांची टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेत आमनेसामने येण्याची ही पहिली वेळ आहे. श्रीलंकेने टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेत टीम इंडिया सुपर 4 फेरीतील आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियासमोर या सामन्यात श्रीलंकेचं आव्हान आहे. उभयसंघातील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन चरिथ असंलका याने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत.
श्रीलंका शेवट गोड करणार?
टीम इंडियाने आधीच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर श्रीलंकेचं स्पर्धेतून पॅकअप झालं आहे.त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना केवळ औपचारिकता आहे. टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य आहे. त्यामुळे टीम इंडियाचा हा सामना जिंकून सलग सहावा विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर श्रीलंकेला सुपर 4 मधील पहिल्या 2 सामन्यात पराभूत व्हाव लागलंय. त्यामुळे श्रीलंका जाता जाता सुपर 4 फेरीत विजय मिळवत टीम इंडियाचा विजय रथ रोखणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टीम इंडियाकडून 2 बदल, कुणाला संधी?
टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ऑलराउंडर शिवम दुबे या दोघांना अंतिम सामन्याआधी विश्रांती दिली आहे. तर अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा या दोघांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबन गिल, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, चारिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुष्मंथा चमीरा, महेश तीक्षाना आणि नुवान थुशारा.
