AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia cup 2025 Pak vs Ban Live Streaming: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सेमी फायनल, कोण जिंकणार?

Asia cup 2025 Pakistan vs Bangladesh Super 4 Live Streaming: आशिया कप 2025 स्पर्धेत गुरुवारी सेमी फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या सामन्याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

Asia cup 2025 Pak vs Ban Live Streaming: पाकिस्तान  विरुद्ध बांगलादेश सेमी फायनल,  कोण जिंकणार?
Pakistan vs Bangladesh Super 4 Asia Cup 2025Image Credit source: PTI AND Francois Nel/Getty Images
| Updated on: Sep 25, 2025 | 1:02 AM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेत सुपर 4 फेरीतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने बुधवारी 24 सप्टेंबरला बांगलादेशवर मात केली. टीम इंडियाचा हा सुपर 4 फेरीतील सलग दुसरा विजय ठरला. तसेच या सामन्याच्या निकालासह आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघही निश्चित झाला. टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली. आता टीम इंडिया अंतिम फेरीत कुणाविरुद्ध भिडणार? याचा निकाल काही तासांनी लागणार आहे. अंतिम फेरीतील एका जागेसाठी आता 2 संघांमध्ये थेट लढत होणार आहे. सुपर 4 मधील पाचव्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहचणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामना केव्हा?

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामना गुरुवारी 25 सप्टेंबरला होणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामना कुठे?

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता टॉस होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

सलमान आगा हा बांगलादेश विरुद्ध पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर लिटन दास या सामन्यात बांगलादेशचं नेतृत्व करणार की नाही? याबाबत शंका आहे. कारण लिटनला दुखापतीमुळे टीम इंडिया विरूद्धच्या सामन्याला मुकावं लागलं. त्यामुळे लिटन पुढील काही तासात फिट न झाल्यास झाकेर अली हा नेतृत्व करताना दिसू शकतो.

सुपर 4 फेरीतील दोन्ही संघांची कामगिरी

सुपर 4 फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेश दोन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 सामने खेळले आहेत. बांगलादेशने सुपर 4 फेरीत श्रीलंकेला पराभूत करत विजयी सुरुवात केली होती. त्यामुळे बांगलादेशकडे भारताला पराभूत करत अंतिम फेरीचा दावा आणखी मजबूत करण्याची संधी होती. मात्र टीम इंडियाने बांगलादेशवर एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे बांगलादेशसाठी अंतिम फेरीच्या हिशोबाने पाकिस्तान विरुद्धचा सामना आर या पार असा असणार आहे. तर पाकिस्तानचीही सारखीच स्थिती आहे.

पाकिस्तानला सुपर 4 मध्ये 21 सप्टेंबरला टीम इंडिया विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. तर 23 सप्टेंबरला पाकिस्तानने श्रीलंकेवर विजय मिळवला. आता 25 सप्टेंबरला पाकिस्तान विजय मिळवत या स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध तिसऱ्यांदा भिडणार की बांगलादेश अंतिम फेरीत पोहचणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.