AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia cup 2025 Points Table : 3 सामन्यांनंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे? टीम इंडिया या स्थानी

Asia Cup 2025 Points Table Standings Ranking : यजमान टीम इंडियाने एकाच सामन्यासह पॉइंट्स टेबलमध्ये धमाका केला आहे. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये पहिल्या स्थानी आहे. बी ग्रुपचा बादशाह कोण? जाणून घ्या.

Asia cup 2025 Points Table : 3 सामन्यांनंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे? टीम इंडिया या स्थानी
Asia Cup 2025 Captains PhotoshootImage Credit source: acc x account
| Updated on: Sep 12, 2025 | 7:52 PM
Share

टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेत आतापर्यंत एकूण 3 सामने खेळवण्यात आले आहेत. या 3 पैकी 2 सामने हे ब गटातील संघांचे झाले आहेत. तर ए ग्रुपचा आतापर्यंत एकमेव सामना झाला आहे. 17 व्या आशिया कप स्पर्धेतील सामने टी 20 फॉर्मेटने खेळवण्यात येत आहेत. आतापर्यंत हाँगकाँगने सर्वाधिक 2 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडिया, यूएई, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 4 संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. या 3 सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ कोणत्या स्थानी आहे? हे जाणून घेऊयात.

आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. अफगाणिस्तानने स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात हाँगकाँगचा धुव्व उडवत विजयी सुरुवात केली. त्यानंतर भारताने 10 सप्टेंबरला होम टीम यूएईला लोळवलं. तर बांगलादेश क्रिकेट टीमने गुरुवारी 11 सप्टेंबरला हाँगकाँगवर मात करत 11 वर्षापूर्वीच्या पराभवाची परतफेड केली. अशाप्रकारे आतापर्यंत 3 सामन्यांचं यशस्वीरित्या आयोजन पार पडलं. आता या तिन्ही सामन्यांमध्ये काय झालं हे थोडक्यात जाणून घेऊयात. त्यानंतर पॉइंट्स टेबलची स्थिती समजून घेऊत.

अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग

अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग यांच्यात 9 सप्टेंबरला अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये पहिला सामना पार पडला. अफगाणिस्तानने हा सामना 94 धावांच्या फरकाने जिंकला. अफगाणिस्तानने हाँगकाँगसमोर 189 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हाँगकाँगच्या फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. अफगाणिस्तानने हाँगकाँगला 20 ओव्हरमध्ये 94 धावांवर रोखलं आणि विजय मिळवला.

दुसरा सामना 27 चेंडूतच संपवला

भारताने 10 सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेच्या मोहिमेतील जबरदस्त सुरुवात केली. भारताने यूएईचा विषय अवघ्या 27 बॉलमध्येच संपवला. कुलदीप यादव याच्या 4 आणि शिवम दुबे याने घेतलेल्या 3 विकेट्सच्या जोरावर भारताने यूएईला 57 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर भारताने 27 चेंडूंमध्ये विजयी आव्हान पूर्ण केलं. भारताने 4.3 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 60 धावा केल्या. भारताने 93 बॉल राखून विजय मिळवल्याने नेट रनरेटमध्ये तगडा फायदा झाला. नेट रनरेट हा एखादा संघ किती चेंडू राखून विजय मिळवतो यावर ठरतो.

तर तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने हाँगकाँगवर 7 विकेट्सने मात करत 2014 मधील पराभवाची परतफेड केली. हाँगकाँगने बांगलादेशवर 2014 टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 2 विकेट्सने मात केली होती. त्यानंतर 11 सप्टेंबरला दोन्ही संघ 11 वर्षांनी आमनेसामने आले होते. बांगलादेशने या सामन्यात 144 धावांचं आव्हान 15 बॉलआधी 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बांगलादेशनेही यासह या स्पर्धेत विजयी सुरुवात केली.

ग्रुप ए मध्ये टीम इंडिया नंबर 1

ग्रुप एमधील आतापर्यंत एकच सामना झाला आहे. टीम इंडियाचा एकमेव पण मोठ्या विजयामुळे नेट रनरेट जबरदस्त आहे. भारताचा नेट रनरेट हा +10.483 असा आहे. टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. तर यूएई -10.483 नेट रनरेट सह चौथ्या स्थानी आहे. तर ओमान आणि पाकिस्तान ए ग्रुपमधील या 2 संघांचा पहिला सामना 12 सप्टेंबरला होणार आहे.

तर बी ग्रुपमधून अफगाणिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. या दोन्ही संघांनी हाँगकाँगलाच पराभूत केलं आहे. मात्र अफगाणिस्तानने बांगलादेशपेक्षा सरस विजय मिळवला आहे. त्यामुळे बांगलादेश बी ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. बांगलादेश दुसऱ्या, श्रीलंका तिसऱ्या आणि हाँगकाँग चौथ्या क्रमांकावर आहे.

अफगाणिस्तानचा नेट रनरेट हा + 4.700 असा आहे. बांगलादेशचा नेट रनरेट हा + 1.001 असा आहे. श्रीलंकेचा अद्याप एकही सामना झाला नाहीय. तर हाँगकाँगचा नेट रनरेट – 2.889 असा आहे. हाँगकाँग या ग्रुपमध्ये चौथ्या स्थानी आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.