AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध 2 बदल करणार! कशी असेल प्लेइंग ईलेव्हन?

Team India Playing 11 Against Sri lanka Super 4 : टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करत कुणाला संधी देऊ शकते? जाणून घ्या.

IND vs SL : टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध 2 बदल करणार! कशी असेल प्लेइंग ईलेव्हन?
IND vs SLImage Credit source: PTI
| Updated on: Sep 26, 2025 | 2:14 AM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम 2 संघ ठरले आहेत. टीम इंडियाने सुपर 4 मधील सलग 2 सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. त्यानंतर पाकिस्तानने बांगलादेश विरुद्ध 25 सप्टेंबरला सुपर 4 फेरीतील पाचव्या सामन्यात  135 धावांचा यशस्वी बचाव केला. पाकिस्तानने बांगलादेशवर 11 धावांनी मात केली. यासह पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक दिली. आता उभयसंघात 28 सप्टेंबरला महामुकाबला होणार आहे. त्याआधी सुपर 4 फेरीतील सहावा आणि शेवटचा सामना हा शुक्रवारी 26 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने असणार आहेत.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियाकडे हा सामना जिंकून विजयी षटकार लगावण्याची संधी आहे. तसेच श्रीलंकेचं या स्पर्धेतून पॅकअप झालंय. त्यामुळे श्रीलंकेचा हा सामना जिंकून या मोहिमेचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. एकूणच दोन्ही संघांसाठी हा सामना केवळ औपचारिकता आहे. मात्र त्यानंतरही टीम इंडिया या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. टीम इंडिया 2 बदल करु शकते.

2 बदलांची शक्यता, कुणाला संधी मिळणार?

टीम इंडियाचा ऑलराउंडर शिवम दुबे याला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर केलं जाऊ शकतं. शिवमला बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात काही खास करता आलं नाही. शिवमने त्या सामन्यात अवघ्या 2 धावा केल्या होत्या. त्यामुळे शिवमच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये फिनिशर रिंकु सिंह याला संधी दिली जाऊ शकते. रिंकूला या स्पर्धेत एकाही सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. त्यामुळे रिंकू या प्रतिक्षेच्या संधीत आहे.

तसेच टीम मॅनेजमेंट बॉलिंगमध्येही 1 बदल करु शकते. वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला महाअंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे बुमराहच्या जागी अर्शदीप सिंह याचा समावेश केला जाऊ शकतो. आता टीम मॅनेजमेंट 2 बदल करणार की आहे त्याच प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरणार? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या