IND vs PAK : टीम इंडियाच्या 5 खेळाडूंचं पाकिस्तान विरुद्ध पदार्पण फिक्स! कोण आहेत ते?

India vs Pakistan Asia Cup 2025 : साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे लागून आहे. या सामन्याला तीव्र विरोध आहे. मात्र त्यानंतरही हा सामना होणार असल्याचं स्पष्ट आहे. या सामन्यात भारताकडून 5 खेळाडू खास पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत.

IND vs PAK : टीम इंडियाच्या 5 खेळाडूंचं पाकिस्तान विरुद्ध पदार्पण फिक्स! कोण आहेत ते?
Tilak Bumrah Axar And Abhishek Team India
Image Credit source: rancois Nel/Getty Images
| Updated on: Sep 13, 2025 | 6:52 PM

भारत विरुद्ध पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांतील महामुकाबल्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. आशिया कप 2025 स्पर्धेतील सहाव्या सामना हायव्होल्टेज होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हे संघ या सामन्यात भिडणार आहेत. दोन्ही संघांनी या स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. भारताने यूएईला पराभूत करत विजयी सलामी दिली. तर पाकिस्तानने आशिया कप स्पर्धेच्या इतिहासातील पहिलाच सामना खेळणाऱ्या ओमानवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यानंतर आता दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.

टीम इंडिया पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी यूएई विरूद्धच्या त्याच 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार की बदल करणार? याची चाहत्यांना उत्सूकता लागून आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम मॅनेजमेंट प्लेइंग ईलेव्हनमध्ये फिरकीपटू कुलदीप यादव याच्या जागी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याचा समावेश केला जाऊ शकतो. मात्र पाकिस्तान विरुद्ध आशिया कप स्पर्धेत 5 भारतीय खेळाडूंचं पदार्पण होणार असल्याचं निश्चित आहे. ते 5 खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला रविवारी 14 सप्टेंबरला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यातून भारताच्या काही खेळाडूंचं पदार्पण होणार असल्याचं निश्चित आहे.

पाकिस्तान विरुद्ध पहिलाच सामना

निवड समितीने आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात 15 खेळाडूंची निवड केली. त्यापैकी 15 पैकी 8 खेळाडू आतापर्यंत एकदाही पाकिस्तान विरुद्ध कधीच टी 20I फॉर्मेटमध्ये खेळलेले नाहीत. तिलक वर्मा, रिंकु सिंह, शुबमन गिल, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि जितेश शर्मा हे भारतीय खेळाडू पाकिस्तान विरुद्ध अद्याप टी 20 फॉर्मटेमध्ये एकही सामना खेळलेले नाहीत. टीम इंडिया यूएई विरूद्धच्या 11 खेळाडूंसह मैदानात उतरली तर 5 खेळाडूंचं पाकिस्तान विरुद्ध टी 20I पदार्पण होईल.

यूएई विरूद्धच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुलदीप यादव, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, शुबमन गिल आणि संजू सॅमसन यांचा समावेश होता. या खेळाडूंनी पाकिस्तान विरुद्ध आतापर्यंत एकही टी 20I सामना खेळलेला नाही. तसेच संजू, तिलक आणि अभिषेक या तिघांनी पाकिस्तान विरुद्ध एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. शुबमन आणि कुलदीप हे दोघे पाकिस्तान विरुद्ध वनडे मॅच खेळले आहेत.

आशिया कप स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या 15 पैकी 7 खेळाडूंना पाकिस्तान विरुद्ध टी 20I सामन्यात खेळण्याचा अनुभव आहे. या 7 खेळाडूंमध्ये कर्णधार सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, हार्दिक पंड्या, अक्षरेेेेेे पटेल, शिवम दुबे आणि अर्शदीप सिंह यांचा समावेश आहे.