
आशिया कप 2025 मधील ग्रुप अ मधील शेवटच्या लीग सामन्यात टीम इंडियाने ओमानचा 21 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 8 गडी गमावून 188 धावा केल्या. प्रत्युत्तरात ओमानचा संघ 20 षटकांत 4 गडी गमावून फक्त 167 धावाच करू शकला.सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला, तर ओमानने टीम इंडियाला कडवी झुंज देत सर्वांची मने जिंकली. खरं तर या सामन्यात एक वेळ अशी होती की हा सामना ओमानच्या पारड्यात होता. 18 व्या षटकात कमाल झाली. हार्दिक पांड्याने घेतलेल्या अप्रतिम झेलमुळे सामन्याचं चित्र पालटलं. ओमानची 17 षटकात 1 गडी बाद 141 धावा अशी स्थिती होती. ओमानला 18 चेंडूत 48 धावांची आवश्यकता आहे. ओमानच्या फलंदाजांना प्रति षटक 16 धावा काढायच्या होत्या. भारत दुसऱ्या विकेटच्या शोधात होता. संघाचं 18वं षटक टाकण्यासाठी हार्षित राणा आला. या षटकातच सामना फिरला.
हार्षित राणाच्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर आमीर कलीमने चौकार मारले. त्यामुळे सामना आणखी अतितटीचा होत असल्याचं जाणवलं. तिसरा चेंडू निर्धाव गेला. पण या षटकाच्या चौथ्या चेंडूवर आमीर कलीम बाद झाला आणि सामना भारताकडे झुकला. कलीमने पांड्या क्षेत्ररक्षण करत असलेल्या बाजूने चेंडू फ्लिक केला. हा चेंडू जवळजवळ षटकारच होता. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमी आता सामना गेला असंच समजत होते. पण हार्दिक पांड्या सुपरमॅनसारखा आणि झेल पकडून सामना आपल्याकडे खेचून आणला. हार्दिक पंड्याने स्फोटक फलंदाज आमिर कलीमला बाद करण्यासाठी एक शानदार कॅच घेतला. आमिर 46 चेंडूत 64 धावा काढून बाद झाला. या फलंदाजाने 7 चौकार आणि 2 षटकार मारले.
Match saving catch by sir Hardik Pandya🐐🔥.#AsiaCup #indvsoman pic.twitter.com/wI3KxRDL2j
— mutual.stark (@mutualstark) September 19, 2025
ओमानने सामना गमावल्यानंतर कर्णधार जतिंदर सिंगने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘संघाचा खूप अभिमान आहे. त्यांनी ज्या पद्धतीने योजना आखल्या आणि अंमलात आणल्या. कठीण परिस्थितीत त्यांनी आपले व्यक्तिमत्त्व कसे दाखवले याचा खूप अभिमान आहे. स्पर्धेचा उत्साह मनात कुठेतरी होता. मी आधी सांगितल्याप्रमाणे, आमच्याकडे अनुभवाची कमतरता आहे. आमच्याकडे ओमानमध्ये विश्वचषक पात्रता स्पर्धा आहे. मुले तयार आहेत. मी त्याला सांगत होतो, ती तुमची आवडती बाद फेरी बनली आहे. तो एक उपयुक्त खेळाडू आणि संघाचा माणूस आहे. आमचा गट पीएनजी आणि सामोआसह आहे. मुले तयार आहेत आणि स्पर्धेची वाट पाहत आहेत.’