AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : पाकिस्तान स्पर्धेतून होणार आऊट, असं गणित जुळलं की धाकधूक वाढली

भारताचं सुपर 4 फेरीतील स्थान जवळपास पक्कं झालं आहे. तर पाकिस्तानसाठी करो या मरोची स्थिती निर्माण झाला आहे. पुढचा सामना खेळणार की नाही याबाबत स्पष्टता नाही. पण खेळला तरी टांगती तलवार आहे. आशिया स्पर्धेत असं गणित जुळून आलं आहे.

Asia Cup 2025 : पाकिस्तान स्पर्धेतून होणार आऊट, असं गणित जुळलं की धाकधूक वाढली
Asia Cup 2025 : पाकिस्तान स्पर्धेतून होणार आऊट, असं गणित जुळलं की धाकधूक वाढलीImage Credit source: ACC Twitter
| Updated on: Sep 15, 2025 | 9:40 PM
Share

आशिया कप स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यांचा थरार शिल्लक आहे. या सामन्यात पाकिस्तानसाठी करो या मरोची स्थिती निर्माण झाली आहे. तर भारताने सुपर 4 फेरीतील स्थान जवळपास पक्कं केलं आहे. दुसरीकडे, भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा उडवल्यानंतर गणित फिस्कटलं आहे. त्यामुळे आता युएईला देखील सुपर 4 फेरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही पाकिस्तान आणि युएई संघासाठी करो या मरोची लढाई आहे. 17 सप्टेंबरला पाकिस्तान आणि युएई यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघाला सुपर 4 फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांची विजयासाठी धडपड असणार आहे. या सामन्यात नेट रनरेटचं गणित काहीच कामाचं नाही. त्यामुळे विजय मिळवून थेट सुपर 4 फेरीचं तिकीट मिळवणं हेच समीकरण आहे. त्यामुळे या सामन्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

पाकिस्तानने पहिल्या सामन्यात ओमानला पराभूत केलं होतं. त्यानंतर भारताकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे पाकिस्तानचा संघ गुणतालिकते 2 गुण आणि +1.649 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर युएईला पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. भारताने युएईचा दारूण पराभव केला होता. पण दुसऱ्या सामन्यात युएईने ओमानचा 42 धावांनी धुव्वा उडवला. यासह 2 गुण आणि -2.030 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि युएई या दोन्ही संघांना समान संधी आहे. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल आणि नेट रनरेटच्या जोरावर पाकिस्तान सुपर 4 फेरीत जाईल.

दुसरीकडे, सामनाधिकाऱ्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बहिष्काराची भूमिका घेतली आहे. पुढच्या सामन्यातून पायक्रॉफ्ट यांना हटवलं नाही तर सामना खेळणार नाही असं पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तान खेळलं नाही तर युएई फायदा होईल. युएईला फुकटात दोन गुण मिळतील आणि सुपर 4 फेरीत जागा मिळवेल. आता आयसीसी सामनाधिकाऱ्यावर कारवाई करते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.