
एसीसी मेन्स एमर्जिंग आशिया कप 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात बी ग्रुपमधील 2 कट्ट्रर प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान भिडणार आहेत. सामन्याचं आयोजन हे दोह्यातील वेस्ट एन्ड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन इरफान खान याने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगची संधी दिली आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात किती धावा करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
वैभव सूर्यवंशी याने यूएई विरूद्धच्या सामन्यात झंझावाती खेळी केली होती. वैभवने त्या सामन्यात 42 बॉलमध्ये 144 रन्स केल्या होत्या. वैभवने या खेळीमध्ये 15 सिक्स आणि 11 फोर लगावले होते. त्यामुळे वैभव पाकिस्तान विरूद्ध कशी कामगिरी करतो? याकडे भारतीय चाहत्याचं लक्ष असणार आहे.
पाकिस्तान आणि भारत या दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे. भारत आणि पाकिस्तानने या स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. भारताने यूएई तर पाकिस्तानने ओमानवर मात केली होती. दोन्ही संघांनी अशाप्रकारे या स्पर्धेतील आपला पहिला सामना जिंकला. त्यामुळे आता या दोन्ही संघांकडे सलग दुसरा सामना जिंकायची संधी आहे. मात्र पाकिस्तानसाठी भारताला पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नसणार. त्यामुळे या सामन्यात कोण मैदान मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान टीम इंडिया बी ग्रुपमधून पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. भारताने यूएईवर 148 धावांच्या मोठ्या फरकाने मात केली होती. त्यामुळे टीम इंडियाला नेट रनरेटमध्ये जबर फायदा झालाय. भारताचा नेट रनरेट हा +7.400 इतका आहे. तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट +2.000 असा आहे.
पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल
🚨 Toss 🚨
India A have been asked to bat first.
Updates ▶️ https://t.co/5Wk1PzTdTp#RisingStarsAsiaCup pic.twitter.com/niij6kEIkD
— BCCI (@BCCI) November 16, 2025
पाकिस्तान ए प्लेइंग ईलेव्हन : इरफान खान (कॅप्टन), मोहम्मद नईम, माझ सदाकत, यासिर खान, मोहम्मद फैक, साद मसूद, गाझी घोरी (विकेटकीपर), शाहिद अझीझ, उबेद शाह, अहमद दानियाल आणि सुफियान मुकीम.
इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : जितेश शर्मा (कॅप्टन आणि विकेटकीपर), वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य, नेहल वढेरा, नमन धीर, रमणदीप सिंग, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, यश ठाकूर, गुरजपनीत सिंग आणि सुयश शर्मा.