AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2024 : अजब योगायोग, पॅट कमिन्सच्या हॅट्ट्रिकच टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप जिंकण्याशी काय कनेक्शन?

AUS vs BAN T20 World Cup 2024 : T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पहिली हॅट्ट्रिक झालीय. पॅट कमिन्सने ही हॅट्ट्रिक घेतली आहे. पॅट कमिन्सने बांग्लादेश विरुद्ध हा कारनामा केलाय. T20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील ही 7वीं हॅट्ट्रिक आहे. या सोबतच कमिन्स T20 वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेणारा दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज बनलाय.

T20 WC 2024 : अजब योगायोग, पॅट कमिन्सच्या हॅट्ट्रिकच टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप जिंकण्याशी काय कनेक्शन?
Pat cummins Hat trickImage Credit source: AFP
| Updated on: Jun 21, 2024 | 10:37 AM
Share

T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने हॅट्ट्रिक घेतली आहे. बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये पॅट कमिन्सने ही हॅट्ट्रिक पूर्ण केली. कमिन्सने महमुदुल्लाह, मेहदी हसन आणि तौहीद हृदय यांची विकेट काढून T20 वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेतली. बांग्लादेशच्या इनिंगमध्ये 18 व्या ओव्हरच्या शेवटच्या 2 चेंडूंवर त्याने महमुदुल्लाह, मेहदी हसनला बाद केलं. त्यानंतर तौहीद हृदयला 20 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर बाद करुन हॅट्ट्रिक पूर्ण केली. T20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील ही 7 वी हॅट्ट्रिक आहे. या यशासह पॅट कमिन्स T20 वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेणारा दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज बनलाय.

पॅट कमिन्सने बांग्लादेश विरुद्ध हॅट्ट्रिक घेताना तीन वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकले. महमुदुल्लाहला शॉर्ट बॉलवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मेहदी हसनला लेंथ बॉल टाकून जंपाकरवी कॅचआऊट केलं. धीम्या चेंडूवर तौहीद हृदयला आऊट केलं. बांग्लादेश विरुद्ध कमिन्सने 4 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन 3 विकेट काढले. पॅट कमिन्स T20 वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेणारा ब्रेट ली नंतरचा दुसरा ऑस्ट्रेलियाई गोलंदाज आहे. ब्रेट ली ने 2007 साली झालेल्या पहिल्या T20 वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेतली होती. त्यावर्षी भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला होता. महत्त्वाच म्हणजे ब्रेट ली ने सुद्धा बांग्लादेश विरुद्धच हॅट्ट्रिक घेतली होती.

वर्ल्ड कप जिंकण्याचे संकेत तर नाही ना

यंदाच्या T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजानेच बांग्लादेश विरुद्ध हॅट्ट्रिक घेतली आहे. हा टीम इंडिया यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्याचे संकेत तर नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे. T20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील हॅट्ट्रिक घेणारा पॅट कमिन्स क्रिकेट विश्वातील 7 वा गोलंदाज आहे.

कोणी-कोणी घेतलीय हॅट्ट्रिक

सर्वात आधी ब्रेट ली ने हा कारनामा केला होता. त्यानंतर 2021 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने हॅट्ट्रिक घेतली. 2021 च्या च T20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या वानिंदु हसारंगा आणि दक्षिण आफ्रिकेच्या कॅगिसो रबाडाने हॅट्ट्रिक घेतली. 2022 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये UAE च्या कार्तिक मय्यपन आणि आयर्लंडच्या जोस लीटिलने हॅट्ट्रिक घेतली.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.