AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs ENG : पर्थ कसोटीत मिचेल स्टार्कच्या शिरपेचात मानाचा तुरा, काय केलं ते जाणून घ्या

एशेज कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला. पहिल्याच दिवशी एकूण 19 विकेट पडल्या. या सामन्यात मिचेल स्टार्कने 12.5 षटकात 58 धावा देत 7 विकेट काढल्या आणि एका विक्रम रचला.

AUS vs ENG : पर्थ कसोटीत मिचेल स्टार्कच्या शिरपेचात मानाचा तुरा, काय केलं ते जाणून घ्या
AUS vs ENG : पर्थ कसोटीत मिचेल स्टार्कच्या शिरपेचात मानाचा तुरा, काय केलं ते जाणून घ्याImage Credit source: PTI
| Updated on: Nov 21, 2025 | 5:11 PM
Share

ऑस्ट्रेलियन संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड नाहीत. पण त्यांची उणीव मिचेल स्टार्कने काय भासू दिली आहे. मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची धार मजबूत असल्याचं दाखवून दिलं. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या वाटेला प्रथम गोलंदाजी आली. त्यामुळे कर्णधार स्टीव्हन स्मिथ नाराज होता. पण मिचेल स्टार्कने त्याची नाराजी दूर केली. त्याने एक दोन नाही तर 7 विकेट काढले. इतकंच काय तर 14 वर्षांच्या क्रिकेट कारकि‍र्दीत जे शक्य झालं नाही ते करून दाखवलं. मिचेल स्टार्कने पहिल्या षटकापासून विकेट घेण्याची सुरूवात केली. तर 12.5 षटकं टाकत 7 गडी बाद केले. त्याच्या घातक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला.

14 वर्षांच्या कारकि‍र्दीत पहिल्यांदाच केलं असं…

मिचेल स्टार्कने पहिल्या स्पेलच्या 6 षटकात 17 धावा देत तीन गडी बाद केले. यात जॅक क्राउली आणि बेन डकेटची विकेट होती. यानंतर जो रूटची विकेट काढली. तीन विकेटपैकी क्राउली आणि जो रूट यांना खातंही खोलता आलं नाही. मिचेल स्टार्कने दुसऱ्या सेशनच्या स्पेलमध्ये आणखी चार विकेट काढल्या. बेन स्टोक्स, गस एटकिंसन, जेमी स्मिथ आणि मार्क वूड यांची विकेट काढली. मिचेल स्टार्कने 2011 मध्ये कसोटीत डेब्यू केलं होतं. या 14 वर्षांच्या कारकि‍र्दीत पहिल्यांदाच कसोटीत 7 विकेट काढल्या आहे. यापूर्वी त्याने 9 धावा देत 6 विकेट काढल्या होत्या. मिचेल स्टार्कने 5 विकेटचा टप्पा 17व्यांदा पार पाडला आहे.

जो रूटला बाद करत दोन टप्पे गाठले

मिचेल स्टार्कने जो रूटची विकेट काढताच एशेज कसोटी मालिकेच्या इतिहासात 100 विकेट पूर्ण केल्या आहे. एशेजमध्ये 100 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा 20वा आणि ऑस्ट्रेलियाचा 13 गोलंदाज ठरला आहे. इतकंच काय तर कर्टली एंब्रोजची कसोटी विकेटशी बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर प्रत्येकी 405 विकेट आहेत. पण एंब्रोजच्या तुलनेत कमी चेंडूत त्याने हा टप्पा गाठला आहे. 2980 चेंडूत त्याने इतक्या विकेट घेतल्या आहेत.

Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल