AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : दुसरा दिवसही ऑस्ट्रेलियाचा, टीम इंडिया अडचणीत, पंत-रेड्डीवर मदार

Australia vs India 2nd Test Day 2 Highlits And Updates : टीम इंडियाचे फलंदाज दुसऱ्या कसोटीतील दुसर्‍या डावातही ऑस्ट्रेलियाच्या धारदार बॉलिंगसमोर ढेर झाले आहेत. टीम इंडियाने 157 धावांच्या प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट्स गमावून 128 धावा केल्या आहेत.

AUS vs IND : दुसरा दिवसही ऑस्ट्रेलियाचा, टीम इंडिया अडचणीत, पंत-रेड्डीवर मदार
Australia vs india 2nd test virat kohli scott bolandImage Credit source: Icc X Account
| Updated on: Dec 07, 2024 | 5:40 PM
Share

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवासाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा दिवसही आपल्या नावावर केला आहे. अॅडलडमध्ये खेळवण्यात येत असलेल्या या डे नाईट सामन्यात ऑस्ट्रेलियाने घट्ट पकड मिळवली आहे. टीम इंडिया या सामन्यात अज्याप 29 धावांनी पिछाडीवर आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या 157 धावांच्या प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत 24 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 128 धावा केल्या आहेत. तर पंत-नितीश रेड्डी ही जोडी नाबाद परतली आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात टीम इंडियाच्या 180 धावांच्या प्रत्युत्तरात 87.3 ओव्हरमध्ये 337 धावा केल्या. कांगारुंनी यासह 157 धावांची आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियासाठी ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. हेडने 140 धावांची खेळी केली. तर मार्नस लबुशेन याने 64 धावांचं योगदान दिलं. तर भारतीय गोलंदाजांनी इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखलं. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स मिळवल्या. तर आर अश्विन आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

भारताचा दुसरा डाव

त्यानंतर दुसर्‍या डावात बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाचे फलंदाज फुस्स ठरले. कांगारुंनी टीम इंडियाला ठराविक अंतराने झटके दिले. केएल राहुल 7, यशस्वी जयस्वाल 24, विराट कोहली 11, शुबमन गिल 28 आणि रोहित शर्मा 6 धावा करुन आऊट झाला. तर खेळ संपला तेव्हा ऋषभ पंत 28 आणि नितीश कुमार रेड्डी 15 धावांवर नाबाद परतले. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँड या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मिचेल स्टार्क याने 1 विकेट घेतली.

आता पंत-रेड्डीवर मदार

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.