AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS: तिसऱ्या सामन्यात तरी कुलदीपला खेळवणार का? गंभीर कुणाचा पत्ता कापणार?

IND vs AUS 3rd Odi Probable Playing 11: सलग 2 सामने गमावल्यानंतर आता शनिवारी 25 ऑक्टोबरला क्लिन स्वीपने पराभव टाळण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या सामन्यात तरी कुलदीप यादवा याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळेल का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

IND vs AUS: तिसऱ्या सामन्यात तरी कुलदीपला खेळवणार का? गंभीर कुणाचा पत्ता कापणार?
Kuldeep Yadav IND vs AUS Odi Series 2025Image Credit source: Gareth Copley/Getty Images
| Updated on: Oct 24, 2025 | 9:48 PM
Share

टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरूद्ध सलग 2 पराभवांसह एकदिवसीय मालिका गमावली आहे. आता टीम इंडियासमोर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात पराभवाची हॅटट्रिकसह क्लिन स्वीप टाळण्याचं दुहेरी आव्हान आहे. शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारताला मालिका वाचवण्यात अपयश आलं. मात्र आता तिसरा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले जाऊ शकतात. दुसऱ्या वनडेत फिरकीपटू कुलदीप यादव याला संधी न दिल्याने हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन शुबमन गिल या दोघांवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता तरी कुलदीपला संधी दिली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच कुलदीपसाठी कुणाला बाहेर केलं जाऊ शकतं? हे समजून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा सामना हा 25 ऑक्टोबरला सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. कुलदीपला अखेरच्या सामन्यात संधी मिळू शकते. कुलदीपने आशिया कप 2025 आणि वेस्टइंडिज विरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केली होती. मात्र त्यानंतरही कुलदीपला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या 2 सामन्यात संधी मिळाली नाही. गंभीर आणि गिलच्या या निर्णयामुळे संताप व्यक्त करण्यात आला. तसेच आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.

एडलेडमधील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल होती. याच खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या एडम झॅम्पा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मात्र कुलदीपला संधी मिळाली नाही. भारताला कुलदीपची या सामन्यात 264 धावांचा बचाव करताना चांगलीच उणीव जाणवली. कुलदीप दुसऱ्या सामन्यात असता तर कदाचित निकाल वेगळा असता.

तसेच सिडनी क्रिकेट ग्राउंडमधील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट कुलदीपला संधी देणार की दुसर्‍या सामन्यातील चुक पुन्हा करणार? याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

कुलदीपसाठी कुणाला डच्चू?

कुलदीपसाठी टीममधून वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा या दोघांपैकी एकाला बाहेर केलं जाऊ शकतं. सुंदरने या मालिकेतील 2 सामन्यांमध्ये 9 ओव्हर बॉलिंग केलीय. सुंदरने 22 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्यात. तर हर्षित राणा याला बॉलिंगने काही खास करता आलेलं नाही. त्यामुळे आता गिल आणि गंभीर काय निर्णय घेतात? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद सिराज.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...