AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : टीम इंडियासमोर सलग तिसरा पराभव टाळण्याचं आव्हान, सामना किती वाजता?

India vs Australia 3rd ODI Live Streaming: टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशा फरकाने पिछाडीवर आहे. त्यामुळे शुबमनसेनेसमोर अंतिम सामन्यात विजय मिळवण्याचं आव्हान आहे.

IND vs AUS : टीम इंडियासमोर सलग तिसरा पराभव टाळण्याचं आव्हान, सामना किती वाजता?
Australia vs India 3rd Odi Live StreamingImage Credit source: Photo by Sarah Reed-CA/Cricket Australia via Getty Images
| Updated on: Oct 24, 2025 | 6:50 PM
Share

भारतीय क्रिकेट चाहत्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतून अनेक अपेक्षा होत्या. मात्र भारतीय खेळाडूंनी पहिल्या 2 सामन्यांमध्ये निराशा केली. भारताला सलग 2 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं. भारताने सामन्यांसह मालिकाही गमावली. शुबमन गिल याची एकदिवसीय कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका होती. मात्र शुबमन आपल्या नेतृत्वात भारताला विजयी सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरला. आता मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतावर क्लिन स्वीपची टांगती तलवार आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाला विजयी हॅटट्रिकची संधी आहे. त्यामुळे टीम इंडिया आता तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजयाने शेवट गोड करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मिचेल मार्श याने आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकून दिली. आता कांगारु सलग तिसरा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. कांगारुंनी भारताला पर्थमध्ये झालेल्या सामन्यात डीएलएसनुसार 7 विकेट्सने पराभूत केलं. तर यजमानांनी दुसरा सामना हा 2 विकेट्सने जिंकला आणि मालिकेवर नाव कोरलं. आता टीम इंडिया सिडनीत कमबॅक करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना केव्हा आणि कुठे पाहायला मिळेल? हे आपण जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा एकदिवसीय सामना कधी?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा एकदिवसीय सामना शनिवारी 25 ऑक्टोबरला होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा एकदिवसीय सामना कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा एकदिवसीय सामना सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे आयोजित करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरुवात होणार. तर 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर tv9marathi.com या आमच्या वेबसाईटवरही सामन्याबाबत लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.