Aus vs Ind 3rd Test | शुभम शानदार ! अर्धशतकासह अशी कामगिरी करणारा गिल ठरला चौथा भारतीय

शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात पहिलंवहिलं अर्धशतक लगावलं.

Aus vs Ind 3rd Test | शुभम शानदार ! अर्धशतकासह अशी कामगिरी करणारा गिल ठरला चौथा भारतीय
शुभमन गिलचे शानदार अर्धशतक
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 5:05 PM

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना (Aus vs Ind 3rd Test) खेळला जात आहे. या तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर आटोपला. यानंतर टीम इंडियाकडून फलंदाजीसाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा (Hitman) आणि शुभमन गिल (Shubhamna gill) ही जोडी मैदानात आली. या जोडीने टीम इंडियाला आश्वासक सुरुवात मिळवून दिली. या जोडीने 70 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र यानंतर रोहित 26 धावांवर बाद झाला. मात्र शुभमन गिलने चांगली खेळी केली. गिलने चेतेश्वर पुजारा मैदानात आल्यानंतर कसोटीतील पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. यासह गिल टीम इंडियाकडून कमी वयात आशियाबाहेर अर्धशतक लगावणारा चौथा फलंदाज ठरला आहे. (aus vs ind 3rd test shubhaman gill become 4th yongest opener indian player who scored fifty)

शुभमन गिलचं पहिलंवहिलं कसोटी अर्धशतक 

आयसीसीने केलेलं ट्विट

नॅथन लायन सामन्यातील 32 वी ओव्हर टाकत होता. गिलने या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेत कसोटीतील पहिलंवहिलं अर्धशतक साजरं केलं. यासह गिल टीम इंडियाकडून आशियाबाहेर सर्वात कमी वयात अर्धशतक लगावणारा चौथा युवा भारतीय फलंदाज ठरला आहे. गिलने आपल्या वयाच्या 21 वर्ष 122 व्या दिवशी ही अर्धशतकी खेळी केली. मात्र गिलला अर्धशतकानंतर एकही धावा करता आली नाही. गिलला पॅट कमिन्सने कॅमरॉन ग्रीनच्या हाती कॅच आऊट केलं.

वनडे आणि टी 20 मध्ये अर्धशतक मारणारे भारतीय

रवी शास्त्रींनी टीम इंडियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून कमी वयात अर्धशतक लगावण्याची कामगिरी केली होती. शास्त्री यांनी वयाच्या 22 वर्षी ही कामगिरी केली होती. तर केएल राहुलने ओपनर म्हणून टी 20 मध्ये टीम इंडियाकडून कमी वयात ही कामगिरी केली. केएलने T 20 क्रिकेटमध्ये 28 व्या वर्षी ही कामगिरी केली.

कमी वयात आशियाबाहेर 50+ धावा करणारे फलंदाज

रवी शास्त्री, 20 वर्ष 44 दिवस, इंग्लंड, 1982

माधव आपटे, 20 वर्ष 108 दिवस, वेस्टइंडिज, 1952/53

पृथ्वी शॉ, 20वर्ष 112 दिवस, न्यूझीलंड, 2019/20

शुभमन गिल, 21वर्ष 122दिवस, ऑस्ट्रेलिया, 2020/21

बॉक्सिंग डे सामन्यातून कसोटी पदार्पण

शुभमन गिलने ऑस्ट्रेलिया विरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यातून कसोटी पदार्पण केलं. मेलबर्नमधील हा दुसरा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना होता. गिल टीम इंडियाकडून कसोटीत पदार्पण करणारा 297 खेळाडू आहे. शुभमनने पदार्पणातील सामन्यात पहिल्या डावात 45 तर दुसऱ्या डावात नाबाद 35 धावांची खेळी केली होती.

संबंधित बातम्या :

Rohit Sharma | हिटमॅन रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटीत विक्रमाची संधी

Australia vs India, 3rd Test : शुभमन गिल-रोहित शर्मा जोडीची अर्धशतकी भागीदारी, 10 वर्षांनी अद्भूत कामगिरी

(aus vs ind 3rd test shubhaman gill become 4th yongest opener indian player who scored fifty)

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.