वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला मारहाण, व्हीडिओ व्हायरल

या कर्णधाराने आपल्या नेतृत्वात टीमला वर्ल्ड चॅम्पियन केलं. मात्र आता हा वर्ल्ड कप विनर कॅप्टन चांगलाच अडचणीत सापडला आहे. प्रेयसीकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आता पोलीस या प्रकरणात सखोल तपास करत आहेत.

वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला मारहाण, व्हीडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 6:41 PM

मुंबई : आपल्या टीमला क्रिकेट वर्ल्ड चॅम्पियन करणाऱ्या माजी कॅप्टनच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं वादळं आलंय. या प्रेयसीने माजी कर्णधारावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओत ही प्रेयसी माजी कर्णधाराला (प्रियकराला) कानशिलात लगावताना दिसतेय. या सर्व प्रकारामुळे या माजी कर्णधाराची चांगलीच नाचक्की झालीय.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क अडचणीत फसला आहे. क्लार्कवर त्याची प्रेयसी जेड यारब्रॉज हीने फसवणूक केल्याचा आरोप केलाय. व्हायरल व्हीडिओमध्ये क्लार्कला त्याची प्रेयसी मारताना दिसतेय. त्यानंत क्लार्क प्रेयसीच्या बहिणीला ठोसा मारतो. स्थानिक माध्यमांमध्ये याबाबतचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

या व्हीडिओत क्लार्क उघडा दिसतोय. या व्हीडिओत क्लार्क त्याच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळताना दिसतोय. मी शपथ खातो, हे काही खरं नाही. मी माझ्या मुलीची शपथ घेतो, असं क्लार्क व्हीडिओत म्हणताना दिसतोय.

हे सुद्धा वाचा

रिपोर्टनुसार, क्लार्क आपली प्रेयसी, यारब्रॉजची बहिण जेस्मीन आणि तिचा नवरा कार्ल स्टेफनोविक यांच्यासह सुट्टीवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघे आपल्या मित्रासोबत डिनर करायला गेले होते. यावेळेस या वादाला तोंड फुटलं. यारब्रॉजची बहिण जेस्मीन ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध निवेदिका आहे.

क्लार्कच्या जीवनात वादळ

वर्ल्ड कप विनर कॅप्टन क्लार्कचं याआधी मॉडेल लारा बिंगलसोबत जोडलं गेलं होतं. दोघंही 2007 मध्ये एकमेकांना डेट करत असल्यं म्हटलं जात होतं. त्यानंतर 2010 मध्ये बिंगलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामुळे दोघेही वेगळे झाले. त्यानंतर क्लार्कने 2012 मध्ये कायली बोल्डसह लग्न केलं.

क्लार्क 2015 मध्ये बाप झाला. कायलीने गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र 5 वर्षांनी 2020 मध्ये दोघेही विभक्त झाले. त्यानंतर क्लार्कने फॅशन डिझायनर पिप एडवर्ड्सला डेट करायला सुरुवात केली. मात्र इथेही दोघांमध्ये उभी फूट पडली.

पोलिसांकडून चौकशी सुरु

दरम्यान व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. “30 वर्षीय महिला आणि 41 वर्षीय पुरुषात झालेल्या या सर्व प्रकाराचा तपास आम्ही करतोय”, अशी माहिती पोलिसांनी दिली. क्लार्क 41 वर्षांचा आहे, तर गर्लफ्रेंड यारब्रॉज 30 वर्षांची आहे.

क्लार्कने आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड चॅम्पियन केलं होतं. ऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली होती. तेव्हा क्लार्क ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.