Icc Champions Trophy 2025 स्पर्धेदरम्यान खेळाडूकडून 16 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीला ब्रेक, कोण आहे तो?
Cricket Retirement : चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार सुरु असताना एका खेळाडूने निवृत्तीचा निर्णय घेत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला आहे. जाणून घ्या तो कोण आहे?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेतील सहभागी 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. ए ग्रुपमधून टीम इंडिया आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर यजमान पाकिस्तानसह बांगलादेशचं या स्पर्धेतून पॅकअप झालं आहे. तर दुसऱ्या बाजूला बी ग्रूपमधून सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. अशात क्रिकेट विश्वातून मोठी समोर आली आहे. स्टार खेळाडूने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूने 16 वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीला ब्रेक लावत असल्याचं जाहीर केलंय. तो खेळाडू कोण आहे? जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ याने निवृत्तीची घोषणा केली आहे. जेसन याने वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत असलेल्या 16 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीला ब्रेक लावत असल्याचं सांगितलं. मात्र मायदेशात-विदेशात होणाऱ्या टी 20 क्रिकेट स्पर्धेत खेळणं सुरु ठेवणार असल्याचं जेसन याने स्पष्ट केलं. जेसन या टी 20 स्पर्धेत यशस्वी ठरला आहे. जेसन बीबीएस स्पर्धेत पर्थ स्कॉर्चर्सचा भाग होता. आता तो मेलबर्न रनेगेड्सच्या गोटात आहे. जेसन आणि मेलबर्न रनेगेड्स यांच्यात 3 वर्षांचा करार झाला आहे.
तसेच राष्ट्रीय संघात निवडीसाठी उपलब्ध असणार, असंही जेसनने स्पष्ट केलं आहे. जेसनने आतापर्यंत 17 टी 20i सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. जेसनने विंडिजविरुद्ध 12 महिन्यांआधी पर्थमध्ये अखेरचा सामना खेळला होता. तसेच जेसनने 2019 पासून ते 2022 दरम्यान 12 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
जेसन काय म्हणाला?
“यासह एका प्रकरणाचा शेवट झालाय, जे फार रोमांचक होतं. मी स्टेट क्रिकेटसाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी ठरलोय. तसेच राष्ट्रीय संघासाठी खेळू शकलो. वाका मैदान माझ्यासाठी घरासारखं राहिलं”, असं जेसनने म्हटलं.
जेसन बेहरेनडॉर्फ याचा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला अलविदा
JUST IN: The end of an era for WA as Jason Behrendorff calls time
READ: https://t.co/bhxTkte4OV pic.twitter.com/7gvSU0V03D
— cricket.com.au (@cricketcomau) February 26, 2025
वयाच्या 19 वर्षी वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत
जेसन वयाच्या 19 व्या वर्षी वेस्टर्न ऑस्ट्रेलियासह जोडला गेला. जेसन पाहता पाहता टीमचा प्रमुख गोलंदाज म्हणून जबाबदारी पार पाडू लागला. जेसनने टीमसाठी 5 विजेतेपद जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. जेसनने या दरम्यान 75 विकेट्स घेतल्या. जेसन वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे.
