
टीम इंडिया मायदेशात टेस्ट आणि वनडे सीरिजनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20i मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया मायदेशात इंग्लंड विरुद्ध प्रतिष्ठेची एशेज सीरिज खेळत आहेत. या दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा टी 20i कॅप्टन आणि अनुभवी ऑलराउंडर मिचेल मार्श याने मोठा निर्णय घेतला आहे. मिचेल मार्श याने राज्यस्तरीय रेड बॉल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आता मिचेल शेफील्ड शील्ड स्पर्धेत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करताना दिसणार नाही. तसेच मार्शच्या या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रेड बॉल क्रिकेटनंतर आता मार्शच्या कसोटी क्रिकेटमधील भविष्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
नुकतंच एमसीजी अर्थात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये मार्शला काही खास करता आलं नाही. त्यानंतर मार्शने आपल्या सहकाऱ्यांना निवृत्तीच्या निर्णयाबाबत सांगितलं. मार्श 2019 पासून राज्यस्तरीय पातळीवर फार सामने खेळला नाही. मार्शला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमुळे 2019 पासून फक्त 9 राज्यस्तरीय सामने खेळता आले आहेत.
मार्शने 2009 साली वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केलं होतं. मात्र आता मार्शने जवळपास 16 वर्षानंतर राज्यस्तरीत रेड बॉल क्रिकेटला अलविदा केला आहे. मात्र मार्श कसोटी क्रिकेटमध्ये खेळणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवड समितीने बोलावल्यास मी एशेज सीरिजमध्ये खेळण्यासाठी तयार असल्याचं मार्शने स्पष्ट केलं आहे. भविष्यात आणखी एक कसोटी सामना खेळणं अवघड वाटतंय, असंही मार्शने मान्य केलं. तसेच त्याआधी ऑस्ट्रेलिया निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी मार्शच्या एशेस सीरिजमध्ये खेळण्याबाबत भाष्य केलं होतं. मार्शचा गेम एशेस सीरिजसाठी नवी ताकद ठरु शकते, असं बेली यांनी म्हटलं होतं. मालिकेच्या सुरुवातीला हा पर्याय निवडण्यात आला नाही. मात्र त्यानंतर परिस्थितीनुसार बदल शक्य आहे, असंही बेली यांनी म्हटलं होतं.
मार्श 11 वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळतोय. मार्शने 2014 साली कसोटी पदार्पण केलं होतं. मात्र मार्श 11 वर्षांच्या हिशोबाने फार कसोटी सामने खेळला नाहीय. मार्शने आतापर्यंत 46 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मार्श याने 46 सामन्यांमध्ये 2 हजार 83 धावा केल्या आहेत. तसेच मार्शने 51 विकेट्सही घेतल्या आहेत.
मिचेला मार्श अखेरचा कसोटी सामना हा टीम इंडिया विरुद्ध खेळला होता. मार्श टी 20i टीमचा प्रमुख खेळाडू आहे. मार्श टी 20i टीमचं नेतृत्व करतो. तसेच ऑस्ट्रेलिया मार्शच्या नेतृत्वात आगामी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. तसेच मार्शने नुकतंच मायदेशात टीम इंडिया विरुद्ध झालेल्या वनडे आणि टी 20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं होतं.