AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघात बदल, कसोटी मालिकेतून हा खेळाडू बाहेर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. अशा स्थितीत संघात बदल करणं भाग पडलं आहे. एका खेळाडूची रिप्लेसमेंट, तर एका खेळाडूच्या दुखापतीमुळे चिंता वाढली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघात बदल, कसोटी मालिकेतून हा खेळाडू बाहेर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघात बदल, वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतून हा खेळाडू बाहेरImage Credit source: PTI
| Updated on: Jun 15, 2025 | 7:42 PM
Share

पॅट कमिन्सच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपद जिंकण्याचं स्वप्न भंगलं. आता पॅट कमिन्सच्या नेतृत्वात पुढच्या पर्वाला सुरुवात होणार आहे. चौथ्या पर्वात ऑस्ट्रेलियाचा पहिला दौरा वेस्ट इंडिजला होणार आहे. ही मालिका विजयी टक्केवारीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. पण ही मालिका सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला संघात बदल करावा लागणार आहे. कारण एक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ब्रेंडन डॉगेट हा राखीव खेळाडू होता. आता त्याला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. क्रिकेट.कॉम.एयूच्या रिपोर्टनुसार, डॉगेटच्या कंबरेला किरकोळ दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियात परतावं लागलं आहे. त्याची जागा भरण्यासाठी ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी संघात शॉन एबॉटची निवड केली आहे. एबॉटचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झालं आहे. यापूर्वी श्रीलंका दौऱ्यात संघासोबत होता. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 50 वनडे आणि टी20 सामने खेळले आहेत. मात्र कसोटी खेळलेला नाही.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथही वेस्ट इंडिज दौऱ्यात असेल की नाही याबाबत शंका आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या दिवशी स्लिफमध्ये झेल पकडताना त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. त्यानंतर तो मैदानात उतरला नाही. त्यामुळे जवळपासून दोन महिने त्याला हाताला पट्टी बांधलेली असणार आहे. त्यामुळे त्याचं खेळणंही अवघड आहे. अशा स्थितीत हे दोन बदल ऑस्ट्रेलिया संघाला वेस्ट इंडिज दौऱ्यात करावे लागणार आहे.

दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात उस्मान ख्वाजासोबत ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने डावाची सुरुवात केली. या सामन्यात लाबुशेन सलामीवीर म्हणून अपयशी ठरला. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामना 25 जून रोजी आहे. तर दुसरा कसोटी सामना 3 जुलै आणि तिसरा कसोटी सामना 12 जुलैला होणार आहे. ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. अशा स्थितीत तिथे मालिका जिंकण्याचं मोठं आव्हान ऑस्ट्रेलियासमोर असणार आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.