AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs SA: David Warner ला डबल सेंच्युरीचा हाय जोश नडला, अखेर दोन खांद्यावरुन मैदानाबाहेर गेला, VIDEO

AUS vs SA: मैदानावर काय घडलं? सेलिब्रेशनचा अतिउत्साहात वॉर्नर बरोबर काय घडलं? जाणून घ्या...

AUS vs SA: David Warner ला डबल सेंच्युरीचा हाय जोश नडला, अखेर दोन खांद्यावरुन मैदानाबाहेर गेला, VIDEO
David-Warner Image Credit source: Getty Images
| Updated on: Dec 27, 2022 | 1:41 PM
Share

मेलबर्न: सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत बॉक्सिंग डे टेस्ट सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेविड वॉर्नरने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कमालीच प्रदर्शन केलं. 3 वर्षानंतर तो अशी लाजवाब इनिंग खेळला. सर्वांनीच वॉर्नरच्या या खेळीच कौतुक केलं. वॉर्नरने त्याच्या 100 व्या कसोटी सामन्यात तितकीच शानदार कामगिरी केली. त्याने या टेस्टमध्ये डबल सेंच्युरी झळकवली. ऑस्ट्रेलियन सलामीवीर वॉर्नरने 254 चेंडूत डबल सेंच्युरी झळकवली. त्यानंतर तो आपली इनिंग पुढे नेऊ शकला नाही. रिटायर्ड हर्ट झाल्यामुळे मैदानाबाहेर जावं लागलं.

त्याला भान राहिलं नाही

77 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर वॉर्नरने बाऊंड्री मारली. एनगिडी ही ओव्हर टाकत होता. त्याने या चौकारासह 200 धावा पूर्ण केल्या. चेंडूने बाऊंड्री लाइनला स्पर्श करताच, वॉर्नर जोशमध्ये आला. त्याने जोरदार सेलिब्रेशन केलं. या जोशमध्ये त्याला भान राहिलं नाही.

हवेत उडी मारली, आणि….

डेविड वॉर्नर डबल सेंच्युरीच्या जवळ होता, त्यावेळी क्रॅम्पमुळे त्याला चालण्यात अडचणी येत होत्या. डबल सेंच्युरीच्या आनंदात तो ही गोष्ट विसरुन गेला. त्याला व्यवस्थित चालता येत नव्हतं. त्याने ब्रेकही घेतला होता. तरीही, त्याने फलंदाजी सुरु ठेवली. 200 रन्स पूर्ण होताच, जोशमध्ये त्याने हवेत उडी मारली. या हाय जोशच्या नादात त्याचं पायाच दुखणं वाढलं. दोन खांद्यांचा आधार लागला

वॉर्नरच दुखण इतकं वाढलं की, तो धड चालूही शकत नव्हता. त्याला मैदानाबाहेर येण्यासाठी दोघांच्या खांद्याचा आधार घ्यावा लागला. वॉर्नर रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर कॅमरुन ग्रीन त्याच्याजागी फलंदाजीसाठी मैदानात उतरला. वॉर्नरने आपल्या इनिंगमध्ये 16 चौकार आणि 2 षटकार लगावले. करिअरमधील 100 व्या टेस्ट मॅचमध्ये डबल सेंच्युरी झळकवणारा डेविड वॉर्नर पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरलाय. इंग्लंडच्या जो रुटने 2021 मध्ये ही कमाल केली होती.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान