AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला तुरूंगास भोगावा लागणार! गंभीर गुन्ह्यात दोषी असल्याचं सिद्ध

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एरॉन समर्स याच्यावरील गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यानेच आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे त्याला दीर्घकालीन तुरूंगवास भोगावा लागणार आहे. आता ऑगस्टमध्ये न्यायालय काय शिक्षा देते? याकडे लक्ष लागून आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला तुरूंगास भोगावा लागणार! गंभीर गुन्ह्यात दोषी असल्याचं सिद्ध
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला तुरूंगास भोगावा लागणार! गंभीर गुन्ह्यात आढळला दोषीImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jul 02, 2026 | 10:07 PM
Share

ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचं भविष्य म्हणून एक काळ असा होता की एरॉन समर्सकडे पाहिलं जात होतं. पण एरॉन समर्सचं करिअर आता पूर्णपणे संकटात सापडलं आहे. क्रिकेटच्या मैदानात फलंदाजांना आपल्या वेगवान माऱ्याने घाबरवणारा गोलंदाज आता एका गंभीर गुन्ह्यात अडकला आहे. त्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा कबूल केला आहे. त्यामुळे त्याला दीर्घकालीन तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. टास्मानियाचं सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाचा अंतिम निकाल ऑगस्टमध्ये देणार आहे. न्यायालयीन कागदपत्रांनुसार, हे प्रकरण 2018 आहे. जेव्हा एरॉन समर्स होबार्ट हरिकेन्स संघाचा सदस्य होता. त्याने सोशल मीडियाद्वारे एका अल्पवयीन पीडितेशी संपर्क साधला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं आणि खटला सुरू झाला. आठ वर्षांनी म्हणजेच जून महिन्याच्या अखेरिस त्याने या प्रकरणातील तीन गंभीर गुन्ह्यांची कबुली दिली.

काय म्हणाले एरॉन समर्सचे वकील?

एरॉन समर्स याचे वकील कॅरोलन ग्रेव्ह्स यांनी न्यायालयात सांगितलं की, घटनेच्या वेळी त्यांचा पक्षकार एका अत्यंत कठीण मानसिकतेतून जात होता. सामाजिकदृष्ट्या एकाकी पडला होता. त्याचा बहुतांश वेळ तो सोशल मीडियावर घालवत होता. सदर प्रकार त्याच्या मनातून कधीच जाणार नाही. पण त्याला पुढे जाण्याची संधी मिळायला हवी. ऑस्ट्रेलियामध्ये किंवा जगात इतरत्र कुठेही व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचे त्याचे स्वप्न आता कायमचे संपले आहे, हे त्याला माहीत आहे.

समर्सचा हा काही पहिला गुन्हा नाही. 2021 मध्ये लैंगिक शोषणाचे चित्रण करणारी सामग्री बाळगल्याच्या आणि प्रसारित केल्याच्या एका वेगळ्या प्रकरणात त्याने आपला गुन्हा कबूल केला होता. त्यात त्याला तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. म्हणजेच यापूर्वीही अशाच गुन्ह्यात दोषी ठरला होता. त्यामुळे त्याला कठोर शिक्षा होणार यात काही शंका नाही. न्यायाधीश हेलन वूड यांनी स्पष्ट केलं की, या प्रकरणात कोणताही दिलासा शक्य नाही. त्याचा जामीनही न्यायालयाने रद्द केला. तसेच त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.

30 वर्षीय एरॉन समर्सने देशांतर्गत क्रिकेटमध्ये बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्स आणि टास्मानियाचे प्रतिनिधित्व केले आहे. समर्सने सात लिस्ट ए सामने आणि तीन टी20 सामने खेळले आहेत. लिस्ट ए सामन्यांमध्ये समर्सने 77 च्या सरासरीने पाच बळी घेतले आहेत. पण टी20 क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये त्याला एकही बळी मिळालेला नाही. समर्स पीएसएल 2019 मध्ये कराची किंग्सकडून खेळला होता.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर