IPL 2022: आयुष बडोनीचा गगनचुंबी षटकार, स्टेडियममधल्या महिलेच्या डोक्यावर चेंडू पडला, पाहा VIDEO

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15 व्या सीझनमध्ये, गुरुवारी चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. हा एक हाय स्कोअरिंग सामना होता, ज्यामध्ये लखनौ संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला.

IPL 2022: आयुष बडोनीचा गगनचुंबी षटकार, स्टेडियममधल्या महिलेच्या डोक्यावर चेंडू पडला, पाहा VIDEO
Ayush Badoni's six Image Credit source: IPL/Twitter
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 9:57 AM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15 व्या सीझनमध्ये, गुरुवारी चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. हा एक हाय स्कोअरिंग सामना होता, ज्यामध्ये लखनौ संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow super Giants) स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. इविन लुईस आणि आयुष बदोनी (Ayush Badoni) लखनौच्या विजयाचे हिरो ठरले. पण त्याची पायाभरणी केएल राहुल आणि क्विंटन डी कॉकच्या जोडीने केली. नाणेफेक जिंकून केएल राहुलने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. चेन्नईचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. रॉबिन उथाप्पा, मोईन अलीने ज्या पद्धतीने सुरुवात केली, ते पहाता केएल राहुलचा निर्णय चुकला असंच वाटलं. चेन्नई सुपर किंग्सने आज प्रथम फलंदाजी करताना 210 धावांचा डोंगर उभारला. लखनौ सुपर जायंट्सला हे लक्ष्य पार करण कठीण जाईल असं वाटलं होतं. पण लखनौने शेवटच्या षटकापर्यंत खेचल्या गेलेल्या या सामन्यात आरामात विजयी लक्ष्य गाठलं.

सामन्यात लखनौ संघाला 12 चेंडूत 34 धावांची गरज होती आणि त्यांच्या 6 विकेट्स शिल्लक होत्या. चेन्नई संघाचा कर्णधार रवींद्र जडेजाने मध्यमगती गोलंदाज शिवम दुबेला 19 वे षटक दिले. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर क्रीझवर असलेल्या आयुष बडोनीने स्वीप शॉट खेळताना डीप स्क्वेअर लेगवर लांब आणि उत्तुंग षटकार लगावला.

महिला जखमी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल

हा चेंडू थेट स्टँड्समध्ये जाऊन एका महिला प्रेक्षकाच्या डोक्याला लागला. चेंडू आदळल्यानंतर त्या महिलेने डोकं पडकलं होतं, मात्र ती टीव्ही स्क्रीनवर दिसतेय हे कळल्यावर तिने स्माईल केलं. त्यावेळी समालोचक सांगत होते की, महिलेला फारशी दुखापत झाली नसावी, अशी आशा आहे. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

लुईस आणि बडोनीच्या 13 चेंडूत 40 धावा

लखनौ संघा संघ धावांचा पाठलाग करत असताना कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉकने सलामीला शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी 61 चेंडूत 99 धावांची शानदार भागीदारी केली. यानंतर अखेरीस एविन लुईस आणि आयुष बडोनी यांनी मिळून 13 चेंडूत नाबाद 40 धावा करत सामना जिंकला.

इतर बातम्या

IPL 2022 points table मध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

IPL 2022, Orange Cap : फॅफ डू प्लेसिसकडे ऑरेंज कॅपचा ताबा कायम, चेन्नईचे स्टार्स देखील ऑरेंज कॅपच्या शर्यतीत

KKR vs PBKS, IPL 2022 Match Prediction: स्फोटक फलंदाज ओडियन स्मिथ KKR वर भारी पडणार? आजची मॅच कोण जिंकणार?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.