LSG vs CSK, Live Score, IPL 2022: लखनौने CSK 211 धावांचं लक्ष्य पार केलं, लुइस आणि आयुष बदोनीची जबरदस्त फलंदाजी

Lucknow super giants vs chennai super kings Live score in Marathi: लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा पहिल्या सामन्यात पराभव झाला होता.

LSG vs CSK, Live Score, IPL 2022: लखनौने CSK 211 धावांचं लक्ष्य पार केलं, लुइस आणि आयुष बदोनीची जबरदस्त फलंदाजी

|

Apr 02, 2022 | 4:22 PM

लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow super Giants) आज स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. इविन लुईस (Evin Lewis) आणि आयुष बदोनी (Ayush Badoni) लखनौच्या विजयाचे हिरो ठरले. पण त्याची पायाभरणी केएल राहुल आणि क्विंटन डि कॉकच्या जोडीने केली. नाणेफेक जिंकून केएल राहुलने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. चेन्नईचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. रॉबिन उथाप्पा, मोईन अलीने ज्या पद्धतीने सुरुवात केली, ते पहाता केएल राहुलचा निर्णय चुकला असंच वाटलं. चेन्नई सुपर किंग्सने आज प्रथम फलंदाजी करताना 210 धावांचा डोंगर उभारला. लखनौ सुपर जायंट्सला हे लक्ष्य पार कठीण जाईल असं वाटलं होतं. पण लखनौने शेवटच्या षटकापर्यंत खेचल्या गेलेल्या या सामन्यात आरामात विजयी लक्ष्य गाठलं.

Key Events

लखनौने जिंकला टॉस

लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन केएल राहुलने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्सची टीम प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरणार आहे.

लखनौ-चेन्नईला पहिल्या विजयाची प्रतिक्षा

ब्रेबॉर्न स्टेडियमवर आज सामना होत आहे. लखनौ आणि चेन्नईचे संघ पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 31 Mar 2022 11:39 PM (IST)

  लखनौने CSK 211 धावांचं लक्ष्य पार केलं

  इविन लुईस आणि आयुष बदोनीने लखनौ सुपर जायंट्सच्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईने दिलेलं 210 धावांच लक्ष्य आरामात पार केलं. लुइसने 23 चेंडूत 55 धावांची तुफान खेळी केली. आयुष बदोनीने दुसऱ्या टोकाकडून 19 धावा फटकावल्या.

 • 31 Mar 2022 11:32 PM (IST)

  लुइसची जबरदस्त फलंदाजी, लखनौला विजयाची संधी

  शिवम दुबेच्या 19 व्या षटकात लुईस आणि आयुष बदोनीने 25 धावा फटकावल्या. लुइसने अर्धशतकही पूर्ण केलं आहे. 23 चेंडूत तो 55 धावांवर खेळतोय.

 • 31 Mar 2022 11:20 PM (IST)

  दीपक हुड्डा OUT

  इविन लुईस एकाबाजूने दमदार फलंदाजी करत असताना दीपक हुड्डा फटकेबाजीच्या प्रयत्नात 13 धावांवर आऊट झाला. ब्राव्होच्या गोलंदाजीवर जाडेजाने झेल घेतला. लखनौच्या चारबाद 172 धावा झाल्या आहेत.

 • 31 Mar 2022 11:01 PM (IST)

  चेन्नईला महत्त्वाचा विकेट मिळाला, धोनीने झेल घेतला

  चेन्नईला लखनौ सुपर जायंट्सचा महत्त्वाचा विकेट मिळाला आहे. क्विंटन डि कॉक 61 धावांवर आऊट झाला. प्रिटोरियसच्या गोलंदाजीवर धोनीने झेल घेतला. लखनौच्या तीन बाद 144 धावा झाल्या आहेत.

 • 31 Mar 2022 10:43 PM (IST)

  लखनौला दुसरा झटका, मनीष पांडे स्वस्तात OUT

  मनीष पांडेच्या रुपाने लखनौ सुपर जायंट्सला दुसरा झटका बसला आहे. अवघ्या पाच रन्सवर तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर ब्राव्होने त्याचा झेल घेतला. दोन बाद 107 अशी लखनौची स्थिती आहे.

 • 31 Mar 2022 10:37 PM (IST)

  लखनौला पहिला झटका, धोकादायक केएल राहुल OUT

  लखनौचा धोकादायक फलंदाज केएल राहुल आऊट झाला आहे. प्रिटोरियसच्या गोलंदाजीवर रायुडूने केएल राहुलचा 40 धावांवर झेल घेतला. लखनौच्या एक बाद 101 धावा झाल्या आहेत.

 • 31 Mar 2022 10:32 PM (IST)

  लौकीकाला जागला, क्विंटन डि कॉकची शानदार हाफ सेंच्युरी

  लखनौचा सलामीवीर क्विंटन डि कॉकने आज लौकीकाला साजेसा खेळ केला. त्याने 34 चेंडूत अर्धशतक झळकावलं. 10 षटकात लखनौच्या 98 धावा झाल्या आहेत.

 • 31 Mar 2022 10:24 PM (IST)

  नऊ षटकात 90 धावा

  CSK प्रमाणे LSG ने ही दमदार सुरुवात केली आहे. नऊ षटकात बिनबाद 90 धावा झाल्या आहेत. राहुल 37 आणि डी कॉक 48 धावा खेळतोय.

 • 31 Mar 2022 10:11 PM (IST)

  CSK प्रमाणे LSG ची सुद्धा 'कडक' सुरुवात

  CSK प्रमाणे LSG ने ही दमदार सुरुवात केली आहे. सलामीवीर क्विंटन डि कॉक (31) आणि केएल राहुल (19) चांगली फलंदाजी करत आहेत. सहा षटकात 55 धावा झाल्या आहेत.

 • 31 Mar 2022 09:48 PM (IST)

  लखनौच्या डावाला सुरुवात

  लखनौ सुपर जायंट्सच्या दोन षटकात 11 धावा झाल्या आहेत. क्विंटन डि कॉक 6 आणि केएल राहुल एक रन्सवर खेळतोय.

 • 31 Mar 2022 09:24 PM (IST)

  CSK ने लखनौला विजयासाठी दिलं 211 धावांचं लक्ष्य

  चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकात सात बाद 210 धावा केल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्सला विजयासाठी 211 धावांचं लक्ष्य दिलं आहे. धोनीने सहा चेंडूत 16 धावा फटकावल्या. यात दोन चौकार आणि एक षटकार होता.

 • 31 Mar 2022 09:14 PM (IST)

  पहिल्याच चेंडूवर कव्हर्समध्ये धोनीने मारला सिक्स

  शिवम दुबेच अर्धशतक अवघ्या एक रन्सने हुकलं. त्याने 30 चेंडूत 49 धावा केल्या. पाच चौकार आणि दोन षटकार लगावले. 19 षटकात csk च्या पाच बाद 199 धावा झाल्या आहेत. पहिल्याच चेंडूवर कव्हर्समध्ये धोनीने सिक्स आणि त्यानंतरच्या चेंडूवर चौकार मारला.

 • 31 Mar 2022 08:58 PM (IST)

  अंबाती रायुडू क्लीन बोल्ड

  रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर अंबाती रायुडू क्लीन बोल्ड झाला आहे. रायुडूने 20 चेंडूत 27 धावा केल्या. यात दोन चौकार, दोन षटकार होते. चेन्नईच्या चार बाद 167 धावा झाल्या आहेत.

 • 31 Mar 2022 08:50 PM (IST)

  15 षटकात चेन्नईच्या 147 धावा

  शिवम दुबे आणि अंबाती रायुडूची जोडी जमली आहे. 15 षटकात चेन्नईच्या तीन बाद 147 धावा झाल्या आहेत. शिवम दुबे 32 आणि रायुडू 20 धावांवर खेळतोय.

 • 31 Mar 2022 08:38 PM (IST)

  शिवम दुबे-अंबाती रायुडूची जोडी मैदानात

  13 षटकात चेन्नईच्या तीन बाद 130 धावा झाल्या आहेत. शिवम दुबे 27 आणि अंबाती रायुडू 11 धावांवर खेळतोय.

 • 31 Mar 2022 08:34 PM (IST)

  चेन्नईच्या तीन बाद 118 धावा

  12 षटकात चेन्नईच्या तीन बाद 118 धावा झाल्या आहेत. शिवम दुबे 16 आणि अंबाती रायुडू 11 धावांवर खेळतोय.

 • 31 Mar 2022 08:29 PM (IST)

  CSK ला तिसरा झटका, मोईन अली OUT

  CSK ला तिसरा धक्का बसला आहे. मोईन अली 35 धावांवर आऊट झाला आहे. आवेश खानने त्याला क्लीन बोल्ड केलं. 11 षटकात चेन्नईच्या तीन बाद 112 धावा झाल्या आहेत.

 • 31 Mar 2022 08:20 PM (IST)

  आक्रमक फलंदाजी करणारा रॉबिन उथाप्पा OUT

  आक्रमक फलंदाजी करणारा रॉबिन उथाप्पा हाफ सेंच्युरी झळकवल्यानंतर रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 27 चेंडूत 50 धावा केल्या. यात आठ चौकार आणि एक षटकार होता. नऊ षटकात चेन्नईच्या दोन बाद 99 धावा झाल्या आहेत.

 • 31 Mar 2022 08:10 PM (IST)

  उथाप्पा-मोईन अलीची फटकेबाजी

  सात षटकात चेन्नईच्या एक बाद 82 धावा झाल्या आहेत.

 • 31 Mar 2022 08:02 PM (IST)

  CSK च्या एक बाद 73 धावा

  रॉबिन उथाप्पाप्रमाणे दुसऱ्याबाजूने मोईन अलीही फटकेबाजी करतोय. पावरप्लेच्या सहाषटकात CSK च्या एकबाद 73 धावा झाल्या आहेत. क्रुणाल पंड्याच्या एक षटकात 16 धावा वसूल केल्या. उथाप्पा 45 आणि मोईन अली 21 धावांवर खेळतोय.

 • 31 Mar 2022 07:57 PM (IST)

  रॉबिन उथाप्पाची आक्रमक फलंदाजी

  रॉबिन उथाप्पाची आक्रमक फलंदाजी सुरु आहे. तो चौफेर फटकेबाजी करतोय. अवघ्या पाच षटकात चेन्नईने 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. उथाप्पाने 20 चेंडूत 44 धावा फटकावल्या आहेत. यात आठ चौकार आणि एक षटकार आहे.

 • 31 Mar 2022 07:52 PM (IST)

  रॉबिन उथाप्पाची दमदार फलंदाजी

  चार षटकात CSK च्या एक बाद 39 धावा झाल्या आहेत. रॉबिन उथाप्पा 30 आणि मोईन अली 6 धावांवर खेळतोय.

 • 31 Mar 2022 07:50 PM (IST)

  मोईन अलीचा षटकार

  आवेश खानच्या गोलंदाजीवर मोईन अलीने शानदार षटकार लगावला.

 • 31 Mar 2022 07:46 PM (IST)

  CSK ला पहिला झटका, ऋतुराज गायकवाड रनआऊट

  सीएसकेला पहिला झटका बसला आहे. ऋतुराज गायकवाड रनआऊट झाला आहे. रवी बिश्नोईच्या चेंडू फेकीने गायकवाड रनआऊट झाला. तिसरं षटक सुरु आहे. चेन्नईच्या एक बाद 28 धावा झाल्या आहेत.

 • 31 Mar 2022 07:42 PM (IST)

  दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार

  दुष्मंथा चमीराच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर उथाप्पाने चौकार लगावला. दोन षटकात CSK च्या 26 धावा झाल्या आहेत. रॉबिन उथाप्पा 20 आणि ऋतुराज गायकवाड दोन धावांवर खेळतोय.

 • 31 Mar 2022 07:40 PM (IST)

  रॉबिन उथाप्पाचा सुंदर षटकार

  दुष्मंथा चमीराच्या दुसऱ्या षटकात रॉबिन उथाप्पाने सुंदर षटकार लगावला.

 • 31 Mar 2022 07:35 PM (IST)

  रॉबिन उथाप्पा-ऋतुराज गायकवाड मैदानात

  रॉबिन उथाप्पा आणि ऋतुराज गायकवाड ही चेन्नईची सलामीची जोडी मैदानात आहे. पहिल्या षटकात चेन्नईच्या 14 धावा झाल्या आहेत.

 • 31 Mar 2022 07:32 PM (IST)

  दुसऱ्या चेंडूवर चौकार

  आवेश खानच्या दुसऱ्या चेंडूवर चेन्नईचा सलामीवीर रॉबिन उथाप्पाने दुसरा चौकार लगावला.

 • 31 Mar 2022 07:32 PM (IST)

  पहिल्याच चेंडूवर चौकार

  आवेश खानच्या पहिल्याच चेंडूवर चेन्नईचा सलामीवीर रॉबिन उथाप्पाने चौकार लगावला.

 • 31 Mar 2022 07:23 PM (IST)

  लखनौची Playing 11

  केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डिकॉक, एविन लुइस, मनीष पांडे, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, आयुष बदोनी, रवी बिश्नोई, आवेश खान, दुष्मंता चमीरा, अँड्रयू टाय,

 • 31 Mar 2022 07:21 PM (IST)

  सीएसकेची Playing 11

  रवींद्र जाडेजा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, मोइन अली, रॉबिन उथाप्पा, अंबाती रायडू, एमएस धोनी, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, तुषार देशपांडे, ड्वेन प्रीटोरियस आणि मुकेश चौधरी

Published On - Mar 31,2022 7:14 PM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें