AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे टीम इंडियासह इंग्लंड दौऱ्यावर जाणार! टेस्ट-वनडे सीरिज खेळण्याची शक्यता

Ayush Mhatre and Vaibhav Suryavanshi : टीम इंडिया आयपीएलनंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आयपीएल 2025 मध्ये आपल्या खेळाने क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेणाऱ्या आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या युवा जोडीची दौऱ्यासाठी निवड केली जाऊ शकते.

Cricket : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे टीम इंडियासह इंग्लंड दौऱ्यावर जाणार! टेस्ट-वनडे सीरिज खेळण्याची शक्यता
Vaibhav Suryavanshi and Ayush Mhatre Team IndiaImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 29, 2025 | 10:36 PM
Share

आयपीएल 2025 मध्ये 17 वर्षीय आयुष म्हात्रे आणि 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी या 2 युवा फलंदाजांनी आपली छाप सोडली आहे. आयुषने मुंबई इंडियन्स विरुद्ध आपल्या घरच्या मैदानात आयपीएल पदार्पण केलं. आयुषने पदार्पणात आपली छाप सोडली. तर दुसर्‍या बाजूला वैभवने 28 एप्रिलला आपल्या तिसऱ्याच सामन्यात शतक ठोकलं. वैभवने गुजरात टायटन्स विरुद्ध 101 धावा केल्या. वैभव आयपीएलमध्ये वेगवान शतक करणारा पहिला भारतीय ठरला. त्यानंतर आता क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आयुष आणि वैभव या 2 युवा खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात जून ते ऑगस्ट दरम्यान कसोटी मालिका खेळणार आहे. सीनिअर टीम इंडियासह बीसीसीआय इंडिया ए आणि 19 वर्षांखालील भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकते. अशाप्रकारे युवा खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, अंडर 19 टीम इंडिया इंग्लंडमध्ये टेस्ट आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या 2 मालिकांसाठी वैभव आणि आयुष या दोघांना खेळण्याची संधी मिळू शकते. हे दोघे खेळाडू 19 वर्षांखालील श्रेणीत मोडतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंडर 19 टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 2 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळणार आहे. जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी वैभव आणि आयुषची निवड होण्याची दाट शक्यता आहे. या दोघांनीही गेल्या काही काळात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

आयुष-वैभवला संधी मिळण्याची शक्यता

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक

एकदिवसीय मालिका

  • पहिला सामना : 27 जून
  • दुसरा सामना : 30 जून
  • तिसरा सामना : 2 जुलै
  • चौथा सामना : 5 जुलै
  • पाचवा सामना : 7 जुलै

कसोटी मालिका

  • पहिला सामना : 12 ते 15 जुलै
  • दुसरा सामना : 20 ते 23 जुलै

आयुष-वैभव अंडर 19 टीमचे सदस्य

वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे हे दोघे अंडर 19 टीम इंडियाचे सदस्य आहेत. वैभवने ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतकही झळकावलं आहे. तसेच वैभव आणि आयुष हे दोघे अंडर 19 आशिया कप स्पर्धेतही सहभागी झाले आहेत. दोघेही टीम इंडियाचे सलामीवीर फलंदाज होते.

Follow Us
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?